५१ बालमावळ्यांची दिमाखदार शिववंदना; शिवाई ग्रुपकडून शिवजयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात शिवाई ग्रुपच्या वतीने ५१ बालमावळ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सादर केलेली शिववंदना विशेष आकर्षण ठरली. शुक्रवार पेठ–उत्तरेश्वर पेठ येथील या बालमावळ्यांनी सौ. यशश्री किशोर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याला खासदार श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज, महापौर रूपराणी निकम, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे (उ. वा. ठा.) विजय देवणे, शिवसेनेचे किशोर घाटगे, नगरसेवक आदिल फरास, निलांबरी साळोखे, राजेश लाटकर, अश्किन आजरेकर, उदय शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
यामध्ये अनय जाधव, विधी जाधव, शमिष्ठा घाटगे, स्वानंदी घाटगे, हर्षवर्धन घाटगे, शिवतेज घाटगे, रणवीर घाटगे, विरांत घाटगे, नरेश बुचडे, देवांश बुचडे, ओमकार घाटगे, केतकी साळोखे, कृष्णाली ओतारी, प्रांजल पाटील, शार्विल पाटील, आदित्य प्रभावळे, वैभवी घाटगे आदी बालमावळ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
पारंपरिक पोशाख, घोषवाक्ये आणि देशभक्तीपर वातावरणामुळे चौक परिसर शिवमय झाला होता. उपस्थित मान्यवरांनी बालमावळ्यांचे कौतुक करत त्यांच्या देशप्रेम व संस्कारांचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment