‘गोकुळ’कडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; ३९६ वी शिवजयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, ता.१९ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, भारताच्या इतिहासातील शौर्य, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्याचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी न्याय, सत्य आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, सक्षम प्रशासन पद्धती आणि सामान्य जनतेच्या कल्याणासाठीची बांधिलकी आजही प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे आणि संचालक अजित नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले, तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी मानले.
या प्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अभिषेक डोंगळे, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, डॉ. दयावर्धन कामत, डॉ. प्रकाश दळवी, डॉ. विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment