आजचे राशिभविष्य

 आजचे राशिभविष्य 

गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६.






 फाल्गुन शुक्ल द्वितीया. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८२. उत्तरायण, शिशिर ऋतू.

राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)


राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००


आजचा विशेष दिन – छत्रपती शिवाजी महाराज जयंती


चंद्र नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा / (रात्री ८.५२ नंतर) उत्तराभाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ / (दुपारी ३.०० नंतर) मीन.

चंद्र युती शनी. चंद्र लाभ हर्षल. चंद्र युती नेपच्यून.

आज उत्तम दिवस.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभस्थानी चंद्र असल्याने आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. अचानक लाभाची शक्यता आहे. मित्रपरिवार मदतीला धावून येईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. शनी युतीमुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) भाग्यस्थान सक्रिय आहे. दूरचा प्रवास संभवतो. अध्यात्मिक गोष्टीत रस वाढेल. नवीन संधी मिळतील. परदेश संबंधित कामे मार्गी लागतील.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) अष्टमस्थानी चंद्र-शनी युती असल्याने आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण टाळा. आर्थिक व्यवहार जपून करा. गूढ विषयात रस वाढेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) सप्तमस्थानी ग्रहयोग अनुकूल आहे. जोडीदाराची साथ लाभेल. भागीदारीत यश मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) कार्यक्षेत्रात मेहनत वाढेल. आरोग्य सुधारेल. जुनी अडचण दूर होईल. कर्मयोग मजबूत आहे. शिस्त पाळल्यास यश निश्चित.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचमस्थानी चंद्र लाभदायक आहे. संतती सुख मिळेल. विद्यार्थ्यांना उत्तम यश. प्रेमप्रकरणात अनुकूलता राहील. सर्जनशीलता वाढेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) गृहसौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटतील. मातृकृपा लाभेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तृतीयस्थानी चंद्रामुळे धाडस वाढेल. लहान प्रवास घडतील. भावंडांशी संबंध दृढ होतील. लेखन, वक्तृत्व क्षेत्रात यश.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) धनस्थान सक्रिय आहे. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीत फायदा संभवतो. मौल्यवान वस्तू खरेदी होईल. कुटुंबात आनंद.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र-शनी युती आहे. गंभीर निर्णय घ्यावे लागतील. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. दुपारनंतर मन शांत होईल. प्रतिष्ठा वाढेल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दुपारी ३ नंतर चंद्र तुमच्या राशीत प्रवेश करेल. मनोबल वाढेल. कल्पनाशक्ती प्रबळ राहील. आध्यात्मिक लाभ होईल. नवीन सुरुवात करण्यास अनुकूल वेळ.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments