निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल रोडवर अपघात; हातगाडीचे मोठे नुकसान

 निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल रोडवर अपघात; हातगाडीचे मोठे नुकसान



कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल रोड दरम्यान आज एका अवजड वाहनाने हातगाडीला जोरदार धडक दिल्याने हातगाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ ए ९२२१ क्रमांकाच्या अवजड वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीला धडक दिली. धडकेनंतर हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती.


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.


या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून संबंधित वाहन चालकाविरोधात कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments