जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत शनाया,नक्षत्रा, अद्वैत व आरुष आघाडीवर

 जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत शनाया,नक्षत्रा, अद्वैत व आरुष आघाडीवर          




              


   कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क 

अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती नऊ वर्षाखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा आज प्रारंभ झाल्या.      

          


  स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धा मुलांच्या व मुलींच्या स्वतंत्र गटात होत आहे या स्पर्धेत जयसिंगपूर इचलकरंजी वारणानगर, गडहिंग्लज व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 37 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मनीष झंवर व व्यावसायिक ओंकार कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले. यावेळी भरत चौगुले, मनिष मारुलकर व आरती मोदी उपस्थित होते आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर व आरुष पाटील गडहिंग्लज हे दोघेजण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहे तर मुलींच्या गटात शनाया मालानी इचलकरंजी व नक्षत्र कांबळे कोल्हापूर या दोघी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. या स्पर्धा जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन व कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी पुरस्कृत केल्या आहेत तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्विसेस चे  कॅप्टन उत्तम पाटील यांनी स्पर्धेसाठी हॉल देऊन सहकार्य केले आहे.

Comments