प्रायव्हेट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून ७ हजार शेण्यांचे दान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श

 

प्रायव्हेट हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून ७ हजार शेण्यांचे दान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श



कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क 

प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूरच्या सन १९७७ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल ७ हजार शेण्यांचे दान दिले. त्यांच्या या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

यावेळी बोलताना ज्येष्ठ कार्यकर्ते कलकल यांनी सांगितले की, कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरातील मृत व्यक्तींचा अंत्यविधी मोफत करण्यात येतो. या सेवेसाठी आवश्यक असलेल्या शेण्यांची उपलब्धता व्हावी, या सामाजिक जाणिवेतून प्रायव्हेट हायस्कूलच्या १९७७ च्या बॅचने हा उपक्रम राबविला आहे.

समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, अशा प्रकारच्या उपक्रमांतून समाजात दानशूरतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अधिकाधिक नागरिकांनी सामाजिक कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी बिपीन लटोरे, नंदकुमार बामणे, दीपक अंकलीकर, दीपक शर्मा, रंगराव भोसले, राजेंद्र धर्माधिकारी, नाना पाटील, प्रभाकर भोसले, किरण भाट आणि सुदेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजोपयोगी कार्यातून सामाजिक भान जपणाऱ्या प्रायव्हेट हायस्कूलच्या १९७७ च्या बॅचचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Comments