व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान
व्हीएतनाम मध्ये झालेल्या सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता एकोंडीचा पैलवान अक्षय ढेरेचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सन्मान
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
कागल तालुक्यातील एकोंडीच्या अक्षय तानाजी ढेरे या पैलवानाने व्हीएतनाम मध्ये झालेल्या अंडर-२३ सीनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा झेंडा फडकवत कोल्हापूरच्या कुस्तीची गुणवत्ता सिध्द करणार्या पैलवान अक्षय तानाजी ढेरे याच्या या ऐतिहासिक यशाबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी त्याचा यथोचित सन्मान केला आणि पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रतिकुल परिस्थितीतही प्रचंड परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या बळावर अक्षयने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा डौलाने फडकवला आहे. त्याची ही कामगिरी महाराष्ट्रातील तमाम युवा खेळाडूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आगामी काळातील जागतिक स्तरावरील सर्वच स्पर्धांसाठी आणि पुढील उज्ज्वल क्रीडा प्रवासासाठी महाडिक कुटूंबिय नेहमीच पाठीशी राहील, अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी, अक्षय ढेरेचा सन्मान केला. यावेळी संभाजी शिंदे, असिफ मुल्लाणी, तानाजी ढेरे, वस्ताद बाळासो राजगिरे, मार्गदर्शक युवराज पाटील, सागर मगदूम, रविंद्र कुंभार, मदन चौगुले उपस्थित होते.

Comments
Post a Comment