सिटी न्यूज़
एक मराठा .. ...... लाख मराठा
मराठा आरक्षणा बद्दल भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने
बिंदू चौक येथे आनंदोत्सव
कोल्हापूर दि.२७ : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वात चर्चेत राहिला. आरक्षण प्राप्तीसाठी मराठा समाजानं अभूतपूर्व मोर्चे काढले. कोल्हापूरमध्ये देखील मोर्चे, उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आली. यानंतर भाजपा-शिवसेना सरकारनं गेल्याच वर्षी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात होत यावर आज न्यायालयानं निकाल देण्यात आला. आज मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केला. यामध्ये मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षण मंजूर झाले.
आज या मराठा आरक्षणा बद्दल भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने बिंदू चौक येथे साखर-पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सरचिटणीस विजय जाधव यांनी या आरक्षणाची माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राहुल चिकोडे म्हणाले, या मराठा आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने रचना लावली, न्यायालयात आरक्षणाची बाजू खंबीरपणे मांडली त्यामुळे त्याचाच हा खरा विजय आहे. मराठा समाजाला आज न्याय मिळाला असून भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले. या आरक्षणामुळे मराठा समाजाची आगामी काळातील प्रगती चांगली होईल असे मत याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी भाजपा नेते, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव म्हणाले, गेली अनेक महिने मराठा आरक्षणाचा हा लढा सुरु होता. मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या सहका-यांसह सातत्यपूर्ण हा विषय लावून धरला. मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल योग्यवेळी सादर केला. त्याचबरोबर सरकारची असणारी सकारात्मक भूमिका या सर्व घटना एकत्रीतपणे पूर्ण झाल्याने हा ऐतिहासिक निर्णय होऊन आज मराठा समजाला मिळाला आहे. तसेच सातत्याने मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील सदावर्ते याची सनद सरकारने रद्द करावी व त्यांचा निषेध केला.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, सुभाष रामुगडे, गणेश देसाई, मारुती भागोजी, नगरसेवक संतोष गायकवाड, श्रीकांत घुंटे, सुरेश जरग, सयाजी आळवेकर, भरत काळे, सौ भारती जोशी, गायत्री राउत, आसावरी जुगदार, लता बर्गे, कविता लाड, चंद्रकांत घाटगे, नचिकेत भुर्के, प्रवीण शिंदे, दिग्विजय कालेकर, विवेक वोरा, गिरीष साळोखे, विश्वजित पवार, अशोक लोहार, नजीर देसाई, संजय सावंत, रविंद्र घाटगे, सचिन जाधव, विजय आगरवाल, संतोष लाड, संदीप कुंभार, विवेक कुलकर्णी, संतोष माळी, अनिल कामत, नजीम अत्तर, सिद्धांत भेंडवडे, दिलीप निंबाळकर, अरविंद वडगांवकर, प्रग्नेश हमलाई आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment