हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना शिवसेना शहर कार्यकारणीच्यावतीने आदरांजली

कोल्हापूर दि.१७ : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱ्या आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणारे एकमेव महानेते म्हणजेच हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. देशातील जाती गाडून सर्वाना एकत्र करण्याचा राजकीय चमत्कार शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केला. सध्या देशात घडत असलेल्या अनिष्ट घटना, देश विरोधी कारवाया याचा बिमोड करण्यासाठी देशातील नागरिकांना खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांच्या विचाराची गरज आहे. मराठी माणसांचे मानबिंदू, हिंदू जणांचे श्रद्धास्थान, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून समस्त शिवसेना शहर कार्यकारणी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
सकाळी शिवसेना शहर कार्यालय येथे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना शहर कार्यकारणीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “शिवसेना जिंदाबाद” “परत या परत या बाळासाहेब परत या” अशा घोषणानी शिवसेना शहर कार्यालय परिसर दणाणून सोडला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड यांनी, शिवसेनाप्रमुख म्हणजे धगधगते शिवतेजच. महाराष्ट्रासह अवघ्या देशभरात देव, देश आणि धर्म याबद्दलचा स्वाभिमान जागा करण्याचे महान कार्य शिवसेनाप्रमुखानी केले. मराठी माणसांच्या धमन्यांमध्ये अस्मितेचे चैतन्य वाहू लागले ते शिवसेनाप्रमुखांमुळेच. मराठी माणसाला अन्यायाविरोधात ताकदीने उभे राहण्याची हिंमत देणारे आणि हिंदुत्वाचा अग्निकुंड अखंडपणे तेवत ठेवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत प्रत्येकालाच आकर्षण आहे. आपल्या रोखठोक ठाकरी शैलीने महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात हिंदुत्वाचे विचार शिवसेनाप्रमुखांनी रुजविले. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या लिखाणांनी आणि वक्तव्यांनी झोपी गेलेल्या मराठी माणसाला जागे केले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विखुरलेला मराठी माणूस ताठ मानेने, स्वाभिमानाने जगू लागला. शिवसेनाप्रमुख आज आपल्यात नसले तरी आजही ते शिवतेज कायम आहे त्यांच्या ज्वलंत विचारांच्या रूपाने. शिवसेनाप्रमुखांचे विचार प्रेरणादायी असून, त्याचे अनुकरण समस्त नागरिकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, अजित राडे, अजित गायकवाड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, विभागप्रमुख अश्विनी शेळके, सुरेश कदम, सुनील भोसले, सुशील भांदिगरे, निलेश हंकारे, उदय भोसले, अंकुश निपाणीकर, सुनील बावडेकर, सुरेश नाळे, विशाल पाटील, युवा सेनेचे गुरु लाड, संदीप भोसले, रविंद्र सोहनी, सौरभ कुलकर्णी, मेघराज लुगाडे, धीरज आवळे, यशवंत पाटील, प्रथमेश निगवेकर, प्रीतेश दुग्गे, क्रिपालसिंह राजपुरोहित, गोविंद वैदू, प्रदीप मोहिते आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment