रिस्टोरेशन अभावी रखडलेल्या रस्त्यामुळे तरुणीचा अपघाती मृत्यू; 'आप'चा रास्ता रोको



रिस्टोरेशन अभावी रखडलेल्या रस्त्यामुळे तरुणीचा अपघाती मृत्यू; 'आप'चा रास्ता रोको



पाईपलाईन खुदाईने खराब रस्ते त्वरित करा; 'आप'चा विजय बेकरी चौकात रास्ता रोको


महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; तरुणीच्या अपघाती मृत्यू प्रकरणी 'आप'ची मागणी

कोल्हापूर 19 सिटी न्यूज नेटवर्क

अमृत योजनेतून पाईपलाईन करण्यासाठी महापालिकेने रस्त्यांची खुदाई केली. परंतु पाईपलाईनचे काम झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे गरजेचे होते. कंत्राटदाराला वारंवार सूचना देऊन देखील शहरातील काही भागात अद्यापही रिस्टोरेशन करण्यात आलेलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून मागील आठवड्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तन्वी सावंत हिचा दुचाकी घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. 



महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील रिस्टोरेशनचे काम रखडले असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने दौलतनगर येथील विजय बेकरी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये स्थानिक महिलांची संख्या लक्षणीय होती.


एका तरुणीचा मृत्यू होऊन देखील महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. रिस्टोरेशन अभावी रखडलेल्या रस्त्याने एका तरुणीचा मृत्यू झाला, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. महापालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

 

यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे,सूरज सुर्वे,राज कोरगावकर,गणेश वडर,अंजली तुंगतकर,गौरी घोरपडे,वैशाली टिपकुर्ले, रविराज पाटील,लाला बिरजे, अक्षय राऊत भाग्यवंत डाफळे,अभिजित कांबळे, शशांक लोखंडे, बसवराज हादीमनी, प्रथमेश सूर्यवंशी, शुभांकर व्हटकर, मंगेश मोहिते,शकील मोमीन, किशोर खाडे,मयूर भोसले,विजय हेगडे, संजय नल्लावडे, धीरज देशपांडे, दत्तात्रय सुतार, दत्तात्रय बोंगाळे, रवींद्र राऊत, कुमाजी पाटील,विजय भोसले,  अमीरअली मणियार, शुभम सुतार, सुनील मोरे, प्रमोद सरनाईक, प्रथमेश काकडे,नितेश नीच्छाम  तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments