पहिली रोबोटीक 'नी रिप्लेसमेंट सर्जरी ' लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी

 पहिली रोबोटीक 'नी रिप्लेसमेंट सर्जरी ' लोकमान्य हॉस्पिटलमध्ये यशस्वी - मेडिकल टुरिझम ला मिळणार चालना  




        कोल्हापूर 23 सिटी न्यूज नेटवर्क

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील टाकाळा - राजारामपुरी येथे स्थलांतरीत     लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातुन गुडघेदुखी उपचारासाठी जगातील प्रगत व अत्याधुनिक असलेली रोबोटिक तंत्रप्रणाली कोल्हापूर येथे उपलब्ध करण्यात आली .  सुप्रसिध्द सांधेरोपण तज्ञ डॉ . राकेश पाटील आणि डॉ . अजिंक्य देशपांडे यांनी  रुग्णांवर रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया यशस्वी केली . वाढत्या वयाबरोबरच गुडघेदुखीचा वाढता त्रास पहाता अनेक रुग्णांना सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो . कालानुरूप अनेक तंत्रप्रणाली विकसित झाल्यापासून या शस्त्रक्रियेत अचुकता यावी म्हणून संगणकाबरोबरच आता रोबोटचाही वापर करण्यात येवू लागला आहे . ग्रामीण भागातील रुग्णांना ही तंत्रप्रणाली उपलब्ध व्हावी , उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा , अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे शस्त्रक्रियोत्तर वेदनांपासून मुक्ती होवून दैनंदिन कामात सहजता व सुलभता येते . त्यामुळे हे तंत्रज्ञान आम्ही कोल्हापूर येथे उपलब्ध केले आहे . अश लोकमान्य हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व रोबोटीक सांधेरोपण तंत्रप्रणालीचे देशातील प्रणेते डॉ . नरेंद्र वैद्य यांच्या पुढाकाराने ही सुविधा उपलब्ध झाली असल्याचे   डॉ . अजिंक्य देशपांडे म्हणाले की प्रत्येक रुग्णांची गुडघ्यांच्या रचनांचा आकारमान , मिती वेगळे असते . त्यामुळे प्रत्येक रुग्णांना एकसारख्या आकाराचा सांधा बसवता येत नाही . रूग्णांनुसार प्रत्येकाचे अचूक मोजमाप घ्यावी लागतात . रोबोटिक असिस्टेड सांधेरोपण शस्त्रक्रियेतील तंत्रप्रणालीमध्ये रुग्णांच्या गुडघ्याची त्रिमितीय अभासी प्रतिमा संगणकात घेता येते . त्यानुसार नियोजन व प्रत्यक्षात रोबोटीक हॅन्डच्या सहाय्याने नियोजनानुसार अंमलबजावणी करता येते व  नैसर्गिक रचनांचे जतन करता येते . लिगामेंट रिलीज करावे लागत नाहीत . रक्तस्त्रावही अत्यल्प होतो . अचूकतेमुळे व तंत्रज्ञानामुळे रिकव्हरी फास्ट होते  ' असे ही नमूद केले. त्यामुळे हे तंत्रज्ञान कोल्हापूर व पंचक्रोशीतील रूग्णांसाठी वरदान ठरणार आहे . आता लोकांना या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जावे लागणार नाही . शिवाय हे आर्थिक दृष्टया परवडेल असे हे आधुनिक वैदकीय तंत्रज्ञान  कोल्हापूरात उपलब्ध झाले आहे . त्यामुळे कोकण - बेळगांव सह सांगलीतील रुग्णांची मोठी सोय होऊन मेडिकल टुरिझम ला ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे . स्लाईड शो ने यांची सविस्तर माहिती देण्यात आली .  या वेळी डॉ . मुझमनिल पटेल , डॉ . राकेश पाटील , श्रीकृष्ण जोशी , प्रशांत पाटील , सुश्रुत माने , डॉ. नचिकेत पाटील, श्रीकृष्ण जोशी  आदि उपस्थित होते .

Comments