दैनिक राशिभविष्य

 सोमवार, १० ऑक्टोबर २०२२. 




अश्विन कृष्ण प्रतिपदा. शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी  ९.००


"आज उत्तम दिवस आहे" सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश. (शुक्र अस्त चालू आहे)   


चंद्र नक्षत्र - रेवती. 


मेष:- खर्चात वाढ करणारा पूर्वार्ध आहे. दगदग वाढेल. प्रवासात त्रास संभवतो.  

     

वृषभ:- आर्थिक उन्नती होईल. संवाद कौशल्य कामास येईल. प्रश्न सुटतील. पूर्वार्ध आनंदाचा आहे.

 

मिथुन:- कामानिमित्त भ्रमंती होईल. कौशल्य कामी येईल. वरिष्ठ नाखुश राहतील. उत्तरार्धअनुकूलआहे.  


कर्क:- सरकारी कामातून लाभ होईल.  मोजके बोला. गैरसमज टाळा. अधिकाराचा योग्य वापर करा. 

 

सिंह:- बदनामीचा धोका आहे. कमी बोला. वाहने काळजीपूर्वक चालवा. पूर्वार्ध त्रासदायक आहे.

  

कन्या:- खुशखबर मिळेल. सूर जुळतील. चांगली बातमी समजेल. सकाळ अनुकूल आहे.

 

तुळ:- उत्तम आर्थिक लाभाचा दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. महत्वाचे करार आज पूर्ण करा. संध्याकाळ आनंदाची.

 

वृश्चिक:- उत्तम दिवस आहे. प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. 


धनु:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. मन आनंदी राहील. घरात काही बदल कराल. कामे मार्गी लागतील. क्रोध टाळा.

 

मकर:- अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. आर्थिक लाभ होतील.

 

कुंभ:- आर्थिक आवक चांगली राहील. कला क्षेत्रात यश मिळेल. कीर्ती आणि मान सन्मान यात वाढ होईल.

 

मीन:- आत्मविश्वास वाढेल. व्यक्त व्हाल. मोठे निर्णय मात्र काळजीपूर्वक घ्या.

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments