खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन

 

खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन 




 कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क

सण, उत्सव, उन्हाळ्याची सुटी, दीपावली या कालावधीत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सकडून भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लुट चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लुट रोखली जावी, याविषयी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रवाशांची आर्थिक लुट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निर्गमित केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने कोल्हापूर येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना देण्यात आले. दीपक पाटील यांनी या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. 


 या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत बराले, शिवसेनेचे करवीरतालुका प्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख श्री. शशिकांत बीडकर, मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. रणजित घरपणकर, हिंदुत्वनिष्ठ श्री. कैलास जाधव, श्री. सुरेश शिलेदार, महाराष्ट्र रिक्शा चालक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजू जाधव, भाजपचे श्री. सतीश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, आदित्य शास्त्री, बाबासाहेब भोपळे उपस्थित होते. 


निवेदनात करण्यात आलेल्या काही मागण्या 


१. खाजगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बुंकिंग केंद्रे आणि गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम किती दर आकारता येईल ? याचा तक्ता दर्शनी भागात लावावा.

२. मोटार वाहन विभाग यांच्या संकेतस्थळावर प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक द्यावा. खासगी ट्रॅव्हल्स आणि बुकींग केंद्रे या ठिकाणीही हा क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा.


 येत्या दिवाळीच्या गर्दीच्या काळात पुन्हा अशा प्रकारे दरवाढ करण्यात येऊ नये, याविषयी दक्षता घ्यावी. 



Comments