"बाळासाहेबांच्या शिवसेने"कडून ढाल - तलवारीचे पूजन

 "बाळासाहेबांच्या शिवसेने"कडून ढाल - तलवारीचे पूजन



कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क

ढाल-तलवार हे चिन्ह महाराष्ट्राचे पारंपारिक प्रतिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार हि निशाणी आहे. ढाल - तलवार हे चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेस मिळणे हा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. ढाल - तलवार हे संघर्षाचे, युद्धाचे प्रतिक असून, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची लढाई बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी व्यक्त केला.


 

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने सकाळी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून वाद्याच्या गजरात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढाल - तलवारीची मिरवणूक काढली . यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ढाल- तलवारीचे पूजन करण्यात आले. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", "मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

  यावेळी बोलताना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी, आम्ही कट्टर शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत म्हणून बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांना साजेस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे चिन्ह मिळाल्याचे आम्हाला अभिमान आहे. आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचे निर्णय घेवून जनहितास प्राधान्य देईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी, मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेस "बाळासाहेबांची शिवसेना" हे नाव आणि "ढाल -तलवार" हे चिन्ह मिळाल्याचे स्वागत करत आहोत. "ढाल -तलवार" हे चिन्ह महाराष्ट्र राज्यात घरोघरी पोहचविण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीचे प्रतिक आणि राज्याच्या अस्मितेचे प्रतिक राज्यातील जनता स्वीकारेल. सन १९६६ साली शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. सुमारे वर्षभराने १९६७ साली शिवसेनेने ठाण्यात पहिली महानगरपालिका निवडणूक लढविली होती. ठाण्यातील पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने ढाल-तलवार हे चिन्ह घेतल होत आणि ठाण्यातील पहिला नगरसेवक याच चिन्हावर निवडून आला होता. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच पहिलं चिन्ह ढाल-तलवार होत. त्यामुळे ढाल-तलवार आणि शिवसेना हे खूप जुनं नात आहे. ४० आमदार, १२ खासदार अनेक पदाधिकारी एकूणच ८० टक्के शिवसेना मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत. त्यामुळे आगामी काळात या चिन्हाच्या माध्यमातून शिवसेना राज्यात आपली विजयाची घोडदौड चालू ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, तुकाराम साळोखे, उदय भोसले, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, महानगर समन्वयक श्रीमती पूजा भोर, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, सौ.गौरी माळदकर, सौ.पूजा कामते, सौ.मंगल कुलकर्णी, सौ.शारदा भोपळे, श्रीमती मीनाताई पोतदार, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, युवा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, शहरप्रमुख पियुष चव्हाण, महानगरयुवा अधिकारी अक्षय कुंभार, जिल्हा सरचिटणीस कुणाल शिंदे, शहर सरचिटणीस दादू शिंदे, शहर शहरसमन्वयक शैलेश साळोखे, आय.टी.सेल. शहरप्रमुख सौरभ कुलकर्णी, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जून आंबी, रिक्षा सेना शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, शहरप्रमुख राजू पोवार, शिवसेना उपशहरप्रमुख अश्विन शेळके, योगेश चौगले, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर, राज जाधव, निलेश गायकवाड, सुरेश माने, सम्राट यादव, कपिल नाळे, कपिल केसरकर, अरुण सावंत, टिंकू देशपांडे, किरण पाटील, निलेश हंकारे, रियाज बागवान, विभागप्रमुख धैर्यशील जाधव, सागर सोनटक्के, अक्षय बोडके, आकाश सांगावकर, विनोद हजारे, राज अर्जुनिकर, संतोष रेवणकर आदी शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.      



Comments