दैनिक राशिभविष्य

 शनिवार, ८ ऑक्टोबर २०२२




अश्विन शुक्ल चतुर्दशी, शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज चांगला दिवस" 'वृद्धी' योग! 


चंद्रनक्षत्र: पूर्वा भाद्रपदा (संध्याकाळी ५.०८ पर्यंत)


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या  फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) महत्वाची कामे दुपारच्या सत्रात करा. संमिश्र कालावधी आहे. सकाळी वादविवाद होऊ शकतात.     

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)  सौख्य लाभेल. कामे पूर्ण होतील. दुपारनंतर मन प्रसन्न राहील.  

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) प्रवास संभवतो. दूरदेशी जाण्याचे योग आहेत. सरकारी कामात चालढकल नको. उत्तरार्ध जबाबदारी वाढवणारा आहे.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कष्टदायी दिवस आहे. धावपळ वाढेल. दुपारनंतर लाभदायक कालावधी आहे.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. दगदग वाढेल मात्र सौख्य लाभेल.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पूर्वार्धात व्यवसायिक यश लाभेल. आर्थिक उलाढाल वाढेल. संध्याकाळ कुटुंबसोबत व्यतीत कराल. गैरसमज टाळा.  

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) धाडसी निर्णय घ्याल. काहीशी चिंता वाटेल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरात कुरबुरी होऊ शकतात. प्रतिष्ठेस धक्का लागू देऊ नका. सरकारी कामात अडथळे येतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मोठी खरेदी होईल.  मन आनंदी राहील. आर्थिक उन्नती होईल. महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. बोलण्यास मान मिळेल. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा आहे.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दुपारनंतर शुभ कालावधी आहे. स्वप्ने साकार होतील. मन आनंदी राहील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) पीडादायक सुरुवात आहे. संयम ठेवा. अध्यात्मिक उन्नतीस उत्तम कालावधी आहे. उत्तरार्ध काहीसा अनुकूल आहे. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)



*८ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-*


     तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत. शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात.


व्यवसाय:-  वैद्यकीय शास्त्र, गणिती,  कंपनी सेक्रेटरी, संशोधन, वैचारिक लेखन, बँकिंग, प्रयोगशाळा उपकरणे, व्यवस्थापक व उद्योग क्षेत्र, बौद्धिक क्षेत्र.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.


शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments