दैनिक राशिभविष्य

 रविवार, ९ ऑक्टोबर २०२२. 





अश्विन पौर्णिमा.शरद ऋतू, दक्षिणायन, शुभकृतनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 


चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा (दुपारी ४.२१ पर्यंत) 


आज दुपारी ३.०० नंतर चांगला दिवस, *कोजागिरी पौर्णिमा* आहे. जेष्ठ अपत्यास ओवाळणे.    


चंद्र मीन राशीत आहे.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) सरळ मार्गाने काम केल्यास उत्तम लाभ होतील. सरकारी कामात अडथळे निर्माण होतील.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उत्तम लाभाचा दिवस आहे. दीर्घकालीन फायदा होईल. मन आनंदी राहील. कला प्रांतात चमक दाखवाल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. सार्वजनिक कामात वेळ व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी मनस्ताप होऊ शकतो. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक नियोजन करा. जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. घरात वेळ द्यावा लागेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आरोग्य सांभाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे कामे आज नकोत. पत्नीकडून लाभ होतील. 


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) शत्रूपिडा जाणवेल. भागीदारी व्यवसायात  लक्ष द्या. कामे रेंगाळतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम  लाभाचा दिवस आहे. धीराने काम करा. मेहनत वाढवावी लागेल. संयम ठेवा.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र ग्रहमान आहे. यशासाठी वाट बघावी लागेल मात्र उशिराने का होईना मेहनतीचे फळ मिळेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अध्यात्मिक लाभ होतील. गुरुची सन्निध लाभेल. भौतिक सुखात कमतरता येईल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. वेळ दवडू नका.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सुखात बाधा येईल. योग्य भूमिका घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक होईल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आत्मविश्वास वाढेल. आध्यत्मिक उन्नती होईल. इतरांना मदत कराल. कलाकारांना चांगले लाभ होतील.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments