दैनिक राशिभविष्य

 रविवार, ११ डिसेंम्बर २०२२. 




मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस, *संकष्टी चतुर्थी* आहे" चंद्रोदय मुंबई - रात्री ८.४० वाजता, नाशिक - रात्री ८.३३, पुणे - रात्री ८.३६.  


मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. धार्मिक कार्यात यश मिळेल. प्राध्यापक लोकांना चांगला दिवस आहे.  

     

वृषभ:- कलाकारांना यश मिळेल. शिक्षक लोकांना चांगली संधी. कौटुंबिक सौख्य लाभेल.

 

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. दुपारी चांगली कामे होतील. धनलाभ होईल.


कर्क:- पूर्वार्ध काहीसा संथ आहे. खर्च वाढतील. संध्याकाळी मेजवानी मिळेल. 

 

सिंह:- सकाळी अनुकूल आहे. कार्य सिद्धीस जाईल. महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा.

  

कन्या:- चांगला दिवस आहे. कामे मार्गी लागतील. उत्तरार्ध अधिक चांगला आहे. 

 

तुळ:- सकाळी छोटे प्रवास घडतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. उपासना लाभदायक ठरेल. 

 

वृश्चिक:- पूर्वार्ध अनुकूल नाही. कामाचे नियोजन चुकेल. दुपारनंतर कामाला वेग येईल.


धनु:- सकाळच्या वेळात कामाचा वेग चांगला असेल. खुशखबर मिळेल. संध्याकाळ विश्रांतीची.

 

मकर:- दिवसाचा पूर्वार्ध चांगला आहे. व्यावसायिक वाढ होईल. प्रगती होईल. संध्याकाळ जोडीदारासोबत व्यतीत कराल.

 

कुंभ:- उत्तम ग्रहमान आहे. चांगले अनुभव येतील. कामाचे नियोजन वेगाने होईल. नवीन कल्पना सुचतील. 

 

मीन:- घरात काही बदल घडतील. कौटुंबिक गोष्टीत रमून जाल. अपत्यांसोबत वेळ घालवा.

 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments