दैनिक राशिभविष्य

 शनिवार, ३ डिसेंम्बर २०२२







. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी, हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज अनिष्ट दिवस *मोक्षदा (स्मार्त) एकादशी, गीताजयंती* आहे" 


चंद्र नक्षत्र - रेवती


मेष:- आयुष्याला दिशा देणारा दिवस आहे. दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय होतील. कामानिमित्त प्रवास घडतील. प्रतिष्ठासाठी खर्च कराल.    

     

वृषभ:-  संवादातून प्रतिष्ठा वाढेल. कीर्ती दिगंत पसरेल. प्रवासात लाभ होतील. सरकारीकामे मार्गी लागतील. सन्मान प्राप्त होतील. 

 

मिथुन:- भौतिक सुखे मिळतील. मोकळ्या स्वभावाचा फायदा होईल. कर्जे मंजूर होतील. येणी वसूल होतील. आध्यत्मिक प्रगती होईल. उच्च शिक्षणासाठी प्रवास घडतील.


कर्क:- अकल्पित लाभ होतील. सासुरवाडी कडून शभ समाचार समजतील.  दूरचे नातेवाईक भेटतील. जेष्ठ व्यक्तींसाठी अनुकूल दिवस.   

 

सिंह:- प्रेमात यश मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक कामात भागीदारीतून लाभ होतील. सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळा.  

  

कन्या:- आर्थिक यश लाभेल. नवीन ग्राहक जोडले जातील. दीर्घकालीन नफ्याचे करार होतील. बोलणी यशस्वी होईल. धावपळ मात्र वाढेल. 

 

तुळ:- बुद्धिमत्ता कामी येईल. चतुराईने प्रश्न सोडवाल. जोडीदाराला समजून घ्या. कुटुंबास वेळ द्यावा लागेल. शेजाऱ्यांशी संवाद साधाल.

 

वृश्चिक:- स्थावर मिळकतीचे प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. प्रगती होईल. वाहनसुख मिळेल. छोटे प्रवास घडतील. 


धनु:- शुभसमाचार समजतील. मन प्रसन्न राहील. भावंड भेटतील आणि महत्वाची चर्चा होईल. सत्संग लाभेल.  

 

मकर:-शेतीतून लाभ होतील. धातूंशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. छंद जोपासाल. मन आनंदी राहील. पाळीव प्राणी घरात येतील. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. 

 

कुंभ:-अत्यंत सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. शब्दाला मान मिळेल. कुटुंबास वेळ द्याल.

 

मीन:-  तुमच्या सामाजिक कार्याची आवड असलेल्या स्वभावाचा प्रत्यय येईल. विक्री व्यवसायात यश मिळेल.  आर्थिक आवक चांगली राहील मात्र खर्च देखील होणार आहे. कला क्षेत्रात यश मिळेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments