आमदार हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा.
गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांचे प्रतिपादन.....
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर झालेल्या सतेज कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी भाषणात म्हणाले, काही राजकीय पक्षांच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महापुरुषांच्या विरोधात उलट- सुलट बोलायला सुरुवात केली आहे. परंतु; त्यामुळे काहीच फरक पडणार नाही. कारण, मुस्लिम समाजाची अत्यंत कमी लोकसंख्या असतानाही आमदार हसन मुश्रीफ कितीतरी वर्षापासून निवडणुका जिंकत आले आहेत. हा आमच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वारसा आहे. लोकशाही आणि संविधानाविरोधी शक्ती सत्तास्थानावर बसल्या आहेत. त्यांच्याकडून लोकशाही आणि संविधानाला पद्धतशीरपणे संपविण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीतही आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारखा लोकप्रतिनिधी जिंकणं आणि आपणा जनतेकडून त्यांना जिंकवल जाणं, हे म्हणजेच खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा पुढे घेऊन जाणं आहे.


Comments
Post a Comment