आता "गोकुळ"ची एन्ट्री फ्लेवर दुधामध्ये : चार नवे फ्लेवर दूध बाजारात उपलब्ध
कोल्हापूर १५ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संस्था आपल्या गुणवत्तेसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.गोकुळ दूध संघ दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या साठी सर्वत्र प्रसिद्ध आहे .
आजपासून गोकुळ ने फ्लेवर दुधामध्ये दमदार एन्ट्री केली आहे. चार दर्जेदार फ्लेवर दूध चोखंदळ ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
त्याचा विक्री शुभारंभ आज रोजी माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या शुभहस्ते तसेच चेअरमन व संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाला.
गोकुळच्या संचालक मंडळाने २०० मि.ली. पेटजार बॉटलमध्ये सुगंधीत दूध पॅकींग करून वितरीत करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. सदरचे सुगंधीत दूध हे गोकुळच्या उच्चत्तम दर्जाच्या व नैसर्गिक दुधापासून तयार केलेले आहे. सुगंधीत दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले असून त्यावर उच्च दर्जाची प्रकिया केलेमूळे ते दूध नॉर्मल तापमांनाला १८० दिवस टिकणारे आहे. त्यामूळे गायीच्या दूधाचा वापरही वाढणार आहे, सुगंधीत दूध तयार करतांना वापरलेले कलर व फ्लेवर हे उच्च दर्जाचे व फुडग्रेड क्वॉलीटीचे असल्याने ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी ) यांनी व्यक्त केला. सध्या सुगंधीत दूध हे स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला व चॉकलेट या चार प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध केलेले असून सदरचे फ्लेवर मिल्क २०० मि.ली. पेटजार बॉटलमध्ये असणार आहे. त्याची ग्राहकांसाठी किमत ३० रुपये राहणार आहे. तरी सदर सुगंधीत दुधाचा फ्लेवर मिल्कचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.
स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले तर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी सविस्तर माहिती दिली तसेच आभार संचालक शशीकांत पाटील चुयेकर यांनी मानले व सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील व माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ, चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर,किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, विजयसिंह मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हनमंत पाटील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.


Comments
Post a Comment