पोलीस - मनपा अग्नीशामक सह इतर सेवेत असलेल्या कर्मचारी बंधूंना चहा - दूध वाटप करत २०२३ नववर्षाचे स्वागत : "हदयस्पर्श" चा एक उत्साही उपक्रम

 पोलीस - मनपा अग्नीशामक सह इतर सेवेत असलेल्या कर्मचारी बंधूंना चहा - दूध वाटप करत २०२३  नववर्षाचे स्वागत : "हदयस्पर्श" चा एक उत्साही उपक्रम 



कोल्हापूर ३१ सिटी न्यूज नेटवर्क

नववर्षाचे पोलीस - मनपा अग्नीशामक सह इतर सेवेत असलेल्या कर्मचारी बंधूंना चहा - दूध वाटप करून आणि शायरन प्रकाशित आरोग्य कॅलेन्डर 2023  देऊन   स्वागत करण्याचा उपक्रम हदयस्पर्श सांस्कृतिक  युवा मंच व संलग्न समविचारी संस्था नी  आयोजित केला आहे .  सामाजिक बांधिलकीच्या व्यसन मुक्तीचा संदेश देत विविध सेवा कार्यातील व्यकीना अभिवादन करण्याच्या  या उपक्रमात हदयस्पर्श युवा मंच सह सावली - फ्रेंडशिप फाउंडेशन स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट - समाजमन  यांच्यासह विविध संस्था संघटना सहभागी होत आहेत तरी सर्वांनी या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी दि . 31 रोजी  रात्री ठीक अकरा सव्वा अकरा वाजता ऐतिहासिक बिंदू चौकात इंडो बेकरी शेजारी जमावे ही नम्र विनंती समन्वयक पद्माकर कापसे राजेंद्र मकोटे - किशोर देशपांडे - सीमा मकोटे - राजेश उर्फ बाळ नाईक - आदिनी केले आहे .

Comments