नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'ची वेबसाइट लॉन्च
ईशा अंबानीकडून आईच्या कलेच्या योगदानाला समर्पित
• सेंटर ३१ मार्च रोजी अभ्यागतांसाठी खुले होणार
• 'द ग्रँड थिएटर'मध्ये २ हजार प्रेक्षक बसू शकतील
• आर्ट हाऊस 16 हजार चौरस फुटांचे असेल
मुंबई, 9 सिटी न्यूज नेटवर्क
'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) ची स्थापना मुंबईतील या स्वप्नांच्या शहरात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये केली जात आहे. केंद्राच्या वेबसाइटचे अधिकृत लोकार्पण आज झाले. 31 मार्च 2023 पर्यंत, हे केंद्र पूर्णत्वास जाऊन अभ्यागतांसाठी खुले केले जाईल.
वेबसाइट लाँचच्या वेळी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, ईशा अंबानीने तिची आई नीता अंबानी यांच्या कलेसाठी केलेल्या समर्पणाला सलाम केला. त्यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांपासून नीता अंबानी रोज नृत्याचा सराव करत आहेत. एक व्यावसायिक महिला, क्रीडाप्रेमी, नेत्या आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा होण्यापूर्वी आई भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
नीता अंबानी यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मी आज जी काही आहे ती नृत्यकलेमुळे आहे. भारताला शिल्पकला, नृत्य, संगीत, नाटक, चित्रकला इत्यादींची परंपरा आहे. भारताच्या कलेचा हा सुगंध जगभर पोहोचावा, हे माझे स्वप्न आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे. मला आशा आहे की इथे येऊन कलाकार त्यांच्या कल्पनाशक्तीला आकार देतील.”
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) मध्ये परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट्सचे प्रदर्शन करणारी तीन मजली इमारत असेल. कला सादर करण्यासाठी 'द ग्रँड थिएटर, द स्टुडिओ थिएटर आणि द क्यूब' सारखी भव्य थिएटर्स बांधली जातील. या सर्वांमध्ये अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. 'द ग्रँड थिएटर'मध्ये दोन हजार प्रेक्षकांना एकाच वेळी कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या प्रदर्शनासाठी 16,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले चार मजली आर्ट हाऊसही सुरू करण्यात येणार आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment