दैनिक राशिभविष्य

 शुक्रवार, ६ जानेवारी २०२३. 





पौष पौर्णिमा, हेमंत ऋतू.  राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज दुपारी ३.०० अंतर चांगला दिवस आहे. *शाकंभरी पौर्णिमा, मग स्नान आरंभ*


चंद्र नक्षत्र - आर्द्रा 


मेष:- लाभ झाले तरी सन्मानास धक्का बसेल. प्रवासात काळजी घ्या. आरोग्य सांभाळा.   

     

वृषभ:- शब्द देताना जपून द्या. कलाकारांना मर्यादित यश मिळेल. राजकीय भाष्य टाळा. कुटुंबिक मतभेद संभवतात.

 

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. मौज कराल. खर्च मात्र वाढेल. काही अकल्पित घटना घडतील.


कर्क:- संमिश्र दिवस आहे. उपासना करा. ध्यानधारणा लाभदायक ठरेल. प्रवासात त्रास होऊ शकतो.

 

सिंह:-सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. योग्य निर्णय घ्याल. आनंदी दिवस आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळेल.

  

कन्या:- मन प्रसन्न राहील. विरोधक नामोहरम होतील. यश मिळेल. व्यवसाय वृद्धी होईल. 

 

तुळ:- वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कामानिमित्त भ्रमंती घडेल. विश्रांतीची गरज भासेल.

 

वृश्चिक:- पिडादायक दिवस आहे. कामात अडथळे येतील. शक्यतो आज विश्रांती घ्या. कामाचा ताण वाढेल.


धनु:- मनासारखा दिवस आहे कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला घ्या. व्यावसायिक यश मिळेल.

 

मकर:- सुखाचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. मेजवानी कराल. राजकीय यश मिळेल.

 

कुंभ:-उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. संतती संबंधित महत्वाचे निंर्णय होतील. प्रगती कराल.

 

मीन:- कामाचा आवाका वाढेल. नवीन कल्पना सुचतील. यश दृष्टीपथात येईल. कामाचा उरक वाढेल.

 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments