इचलकरंजी मधील सर्व चित्रपट गृहांनी पठाण चित्रपट लावू नये :- विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे आवाहन

 इचलकरंजी मधील सर्व चित्रपट गृहांनी पठाण चित्रपट लावू नये :- विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे आवाहन.




 हिंदूंच्या जनभावना दुखावणारा पठाण चित्रपट लावणार नाही पंचवटी चित्रपट गृहाने केले जाहीर.. 


कोल्हापूर (इचलकरंजी) १३ सिटी न्यूज नेटवर्क 

जातीय तेढ निर्माण करणारा व समस्त हिंदू समाजा च्या भावना दुखवणाऱा पठाण नामक हिंदी चित्रपट येत्या काही दिवसात हिंदुस्थान मध्ये प्रदर्शीत होण्याच्या वाटेवर आहे.त्या पूर्वी या चित्रपटाची गाणी व ट्रेलर दाखवण्यात आला. चित्रपटातील एक गाणे जे प्रदर्शीत झाले होते त्यामध्ये मुद्दाम चित्रपटातील अभिनेत्रीला भगवा रंगाच्या बिकनी मध्ये दाखवत अश्लील अंग प्रदर्शन करत हिंदूंच्या भावना मोठया प्रमाणात दुखावत समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात आला त्यास विरोध केल्या नंतर खुद्द सेन्सॉर बोर्ड ऑफ इंडिया ने त्या गाण्या ला कात्री लावली व बदल सुचवलेत. हिंदू च्या तीव्र भावना लक्ष्यात घेता काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपट पाठवण्यात आला. पठाण चित्रपटातील गाणं आणि चित्रपटाचा काही भाग बदलण्याची सूचना सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांनी फिल्ममेकर्सला दिली आहेत. हिंदू विरोधी पठाण चित्रपटात तब्बल २१ ठिकाणी बदल करण्यात आले आहेत ज्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या होत्या..

                 चित्रपटाच्या गाणे व ट्रेलर मधूनच हिंदूंच्या भावनांचा अपमान केला जात असेल तर संपूर्ण चित्रपटातुन् किती भावना दुखावल्या गेली असतील याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. त्यातूनच हिंदू समाजातील उद्रेक बाहेर पडून समाजविघातक बाबी घडण्याच्या शक्यता नाकारता येणार नाही.सदर चित्रपटास अखंड हिंदुस्थान भर विरोध होत आहेत..हिंदुस्थानातील काही राज्या मधील चित्रपट गृह मालकांनी स्वतःहून पठाण चित्रपट त्यांच्या चित्रपट गृहात न लावण्याचे घोषित केले आहे..आपले संत महंत ही हा चित्रपट लावू नये म्हणून आग्रही आहेत..या सर्व बाबी टाळ्याच्या असतील तर हिंदूंच्या जन भावनेचा आदर करून आपण इचलकरंजी शहरातील आपल्या चित्रपट गृहात पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना निवेदना द्वारे देण्यात आल्या..

              देशातील विविध राज्यामधील चित्रपट गृहे हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेऊ शकतात तर आपणही कोणतेही टेकनिकल कारण न सांगता आपल्या चित्रपट गृहात पठाण हा चित्रपट लावू नये व समस्त हिंदू जन मनाचा आदर कराल असे आम्ही अपेक्षित धरतो.. तरीही आपण चित्रपट प्रदर्शित केलात तर होणाऱ्या समाजविघातक बाबीस आपण स्वतःजबाबदार असाल.बॉलीवूडचा हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रदीर्घ इतिहास आहे परंतु हिंदू समाज येथून पुढे हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रकारच्या अपमान व हीन वागणूक अशा समाज कंटकांकडून सहन करणार नाही.सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यास हिंदू समाजाच्या भावना दुखावुन त्यातून हिंदू जन माणसाचा उद्रेक होणे निश्चित व अपरिहार्य असे बजरंग दला तर्फे स्पष्ट सांगण्यात आले..

इचलकरंजी शहरातील फोर्चून सिनेफ्लेक्स,राधाकृष्ण, गुरु,पंचवटी,भाग्यरेखा आदी ना निवेदन देण्यात आले..


निवेदन देताना सुजित कांबळे,सोमेश्वर वाघमोडे,प्रवीण सामंत, बाळासाहेब ओझा,मुकेश चौथे,मुकुंद उरूनकर,अनिल सातपुते, संदीप जाधव,डांगरे मामा, विक्रांत ढवळे,उमाकांत दाभोळे, अरविंद शर्मा,विशाल माळी,म्हाळसाकांत कवडे,अमित पाटील आदी पदाधिकारी व बजरंगी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Comments