सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव शहर कार्यालय शुभारंभ

 “सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव शहर कार्यालय शुभारंभ - सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक एम. आर. आय व फिलिप्स अझ्युरिऑन मशीनचा लोकार्पण सोहळ्याचे रविवारी आयोजन”




कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाच्या वतीने 1 सिद्धगिरी मठ, कणेरी येथे येत्या २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत *आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव' संपन्न होणार आहे. या लोकोत्सवाच्या कोल्हापूर शहरातील 'संपर्क कार्यालयाचा शुभारंभ ' रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता, वैभव अपार्टमेंट, 'कृष्णगंगा' बंगल्यासमोर, टाकाळा, माळी कॉलनी, येथे संपन्न होत आहे पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या पवित्र सानिध्यात आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते व संपन्न होणार आहे. या शुभारंभ सोहळ्यानंतर सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या पूर्व तयारीची माहिती हि सर्वाना दिली जाणार आहे.


यानंतर कणेरी मठावर एन. ए. बी. एच. मानांकित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मध्ये अत्याधुनिक एम.आर.आय व फिलिप्स अझ्युरऑन मशीनचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होत आहे. तरी या दोन्ही उपक्रमास सिद्धगिरी कणेरीमठ परिवाराच्या सर्व हितचिंतक, नागरिक मान्यवरांनी सहभागी व्हावे असे आवाहन मध्यवर्ती संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.-

Comments