दैनिक राशिभविष्य

 रविवार, १ जानेवारी २०२३. 






पौष शुक्ल दशमी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी  ६.००


चंद्र नक्षत्र - अश्विनी. आज चांगला दिवस आहे. 


मेष:- अचानक काही सुखद घटना घडतील. आरोग्य उत्तम राहील. प्रतिष्ठा वाढेल. 

     

वृषभ:- अनपेक्षित खर्च वाढेल. सन्मानासाठी खर्च कराल. सुखद घटना घडेल.

 

मिथुन:- उत्तम दिवस आहे. सुरुवात चांगली होईल. येई वसूल होतील. यश मिळेल.


कर्क:- वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. आनंदी वाटेल. सरकारी कामे मार्गी लागतील. 

 

सिंह:- जेष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. धनलाभ होईल. नवीन खरेदी कराल.

  

कन्या:- स्त्री धनात वाढ होईल. छोटे प्रवास घडतील. वाहन काळजीपूर्वक चालवा.

 

तुळ:- भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. प्रगती होईल. 

 

वृश्चिक:- व्यवसायात उत्तम प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. कार्यक्षमता वाढेल.


धनु:- संतती कडून शुभ समाचार समजतील. आनंदी दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल.

 

मकर:- शेती आणि जमिनीची कामे मार्गी लागतील. गृहसौख्य लाभेल.

 

कुंभ:- व्यवसाय वृद्धी होईल. लेखनातून लाभ होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. 

 

मीन:- मनाच्या आनंदासाठी खर्च कराल. कौटुंबिक सौख लाभेल. प्रसन्न वाटेल.  



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments