महाराष्ट्र हायस्कूल मध्ये शारीरिक शिक्षण कवायत संपन्न

 महाराष्ट्र हायस्कूल मध्ये शारीरिक शिक्षण कवायत संपन्न



कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

 येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या शाळेत शरीरिक शिक्षण,एन. सी.सी, एम.सी.सी, आर.एस.पी व स्काऊट विभागाची प्रात्यक्षिके उत्साहात पार पडली.



 रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी यांच्या स्वप्नातला बलशाली भारत महाराष्ट्र हायस्कूलमध्ये घडतोय महाराष्ट्र हायस्कूल ही मराठी माध्यमाची शाळा असून या शाळेमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जाणारे संस्कार म्हणजे राष्ट्राला अभिप्रेत असणारे आदर्श नागरिक घडविण्याचे उत्तम प्रकारे चाललेले कार्य आहे. असे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ अंबोकर यांनी केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मा.लेफ्टनंट कर्नल एम.सी. मुथ्थन्ना म्हणाले, राष्ट्र निर्मितीमध्ये शारीरिक शिक्षण, एन.सी.सी, एम.सी.सी, आर.एस.पी, या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण महत्त्वाचे आहे या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, स्वयंशिस्त निर्माण होते त्यामुळे असे कार्यक्रम सर्वच शाळेमध्ये होणे आवश्यक आहे. ते देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.



या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी मास. पी.टी, समूहगीत, कवायत प्रकार, मल्लखांब, रोप मल्लखांब, मानवी मनोरे, लेझीम, जिम्नॅस्टिक, सिग्नल पेटी, आर्मी सॉंग, आदर्श चौक, अग्निशमन प्रात्यक्षिक व  उरी द सर्जिकल स्ट्राइक यासारख्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूरचे चेअरमन श्री. के.जी. पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. डी. जी.किल्लेदार, खजाननीस श्री. वाय. एस. चव्हाण, संचालक, संचालक श्री. आर. डी. पाटील, श्री. विनय पाटील, श्री पी.सी.पाटील, सौ एस आर पाटील, अजीव सेवक श्री. सी. एम. गायकवाड, श्री. ए.डी. निकम, श्री उदय पाटील, शाळेचे पर्यवेक्षक श्री. जे. पी. कांबळे, श्री  .एस.ए. जाधव,सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य श्री. एस. एस. पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य श्री. यु. आर. आतकीरे यांनी मांनले. तर सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख श्री.संजय मोरे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



Comments