शहीद महाविद्यालयामार्फत विविध शिबिरांचे आयोजन

 शहीद महाविद्यालयामार्फत  विविध शिबिरांचे आयोजन 



कोल्हापूर  ता. १० सिटी न्यूज नेटवर्क 

      येथे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे आणि वालावलकर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तगट, सामान्य चिकित्सा आणि डोळे तपासणीचे शिबीर झाले. अंगारक संकष्टी निमित्त तुरंबे गणेश मंदिर  येथे आलेल्या भाविकांनी उत्स्फुर्तपणे या शिबिरास प्रतिसाद दिला.  जवळपास तीनशेहून अधिक भाविकांची याप्रसंगी आरोग्य तपासणी करण्यात आली.  

वालावलकर हॉस्पिटलच्या डॉ. वीरेंद्र वनकुंद्रे, डॉ. मनीषा रोटे, प्रा. राधिका शिंदे, प्रा. काजल बलुगडे व विद्यार्थिनींनी तपासणी केली. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ पोवार यांच्या सहकार्यातून हे शिबीर पार पडले. राजेंद्र मकोटे यांनी संपूर्ण शिबिराचे समन्वयक म्हणून जबाबदारी पहिली. 

  शहीद महाविद्यालयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील  ११० गावांमधील ९०० हून अधिक  विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत.  येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी कॉम्प्युटर सायन्स, मास मीडिया, डी. एम. एल. टी., कॉम्प्युटर सायन्स, बी.एस्सी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एम.एस्सी कम्प्युटर सायन्स,  एम.एस्सी  मायक्रोबायोलोजी, एम.एस्सी रसायनशास्त्र असे आधुनिक, व्यावसायिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम  शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी टी.सी.एस., कॅप्जेमिनी सारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेत.  संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. विद्यानिकेतन गुणवत्ता शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शहीद पब्लिक स्कूलने अनेक इंजिनियर्स ,डॉक्टर्स व विविध क्षेत्रातील यशवंत घडविले आहेत. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे.

  यावेळी. सिद्धिविनायक ट्रस्ट तुरंबेचे पदाधिकारी अरुण पालंगे,संभाजी राऊत,राजेंद्र चौगले,भीमराव पोवार,संदीप पाटील  सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर,प्रा.वैभव कुंभार, प्रा.सागर शेटगे प्रा.दिग्विजय कुंभार   आदि शिक्षकांसमवेत बीएस्सी मायक्रोच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

Comments