कोल्हापुरात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या जंगी स्वागताची तयारी

 कोल्हापुरात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या जंगी स्वागताची तयारी

 


कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर उद्या दि.१९ रोजी येणार आहेत. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब याचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्याची तयारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. उद्या दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता "गंगावेश चौक, कोल्हापूर" येथे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचे जंगी स्वागत  पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्यावतीने करण्यात येणार आहे. या संपूर्ण दौऱ्याकरिता शिवसैनिकांनी कोल्हापुरातील वातावरण भगवेमय केले आहे. या दौऱ्याची नियोजनात्मक बैठक आज शिवालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेतृत्वाच्या जंगी स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, किशोर घाटगे, उदय भोसले, रिक्षा सेना शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, राजू पोवार, युवासेना शहरप्रमुख पियुष चव्हाण, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, उपशहरप्रमुख अश्विन शेळके, सचिन भोळे, योगेश चौगले, मंदार तपकिरे, सुरेश माने, सम्राट यादव, कपिल नाळे, कपिल केसरकर, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, रियाज बागवान, राजू काझी, अमित कांबळे यांच्यासह शिवसेना, युवासेना, अंगीकृत संघटना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments