दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

रविवार, २ जुलै २०२३





आषाढ शुक्ल चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.०० 


आज दुपारी १.०० नंतर चांगला आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/धनु. 


चंद्र नक्षत्र - ज्येष्ठ


मेष:- पूर्वर्धात गृहसौख्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक चांगला आहे. पराक्रम गाजवाल. शेअर्समधून लाभ होतील.     

     

वृषभ:- पूर्वार्ध अनुकूल आहे. नात्यातून लाभ होतील. कलाप्रांतात चमक दाखवाल. समाजात दबदबा वाढेल.

 

मिथुन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. 


कर्क:- मन आनंदी राहील. सुखासीन दिवस आहे. कठोर भूमिका घ्याल. शब्दास मान मिळेल.  

 

सिंह:- वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. क्रोधावर नियंत्रण ठेवा. अंदाज अचूक ठरतील. 

  

कन्या:- अनुकुलो दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. सुखद अनुभव येतील. उत्तरार्ध स्व- सुखासाठी खर्चाचा आहे. 

 

तुळ:- कामाच्या ठिकाणी महिलांकडून सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. पाण्यापासून काळजी घ्या. 

 

वृश्चिक:- आत्मविश्वास वाढला तरी तो अति नसावा हे लक्षात ठेवा. प्रवास घडतील. लक्ष्मी प्रसन्न होईल. सौख्य लाभेल. 


धनु:- पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही.  व्यसने टाळा. उत्तरार्ध आनंद वाढवणारा आहे. आप्त भेटतील. 

 

मकर:- पूर्वार्ध चांगला आहे. कामे मार्गी लागतील. उत्तरार्ध विश्रांतीचा. 

 

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. कनिष्ठ महिला सहकाऱ्याकडून सहकार्य लाभेल. विरोधक पराभूत होतील. कोर्टात यश लाभेल.   

 

मीन:- आर्थिक लाभदायक दिवस आहे. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. हरवलेली वस्तू सापडेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments