कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ निवड बुद्धिबळ स्पर्धा: आदित्य, प्रणव, दिव्या व सोहम आघाडीवर

 कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ निवड बुद्धिबळ स्पर्धा: आदित्य, प्रणव, दिव्या व सोहम आघाडीवर

कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ निवड बुद्धिबळ स्पर्धेचे पटावर चाल करून उद्घाटन करताना प्रसिद्ध सनदी लेखापाल सतीश डकरे व श्रीराज भोसले यावेळी डावीकडून धनंजय इनामदार,दिव्या पाटील, भरत चौगुले, दिशा पाटील, प्रीतम घोडके, मनीष मारुलकर,सोहम खासबारदार व धीरज वैद्य



कोल्हापूर 16 सिटी न्यूज नेटवर्क

 चेस असोसिएशन कोल्हापूर च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा खुल्या वरिष्ठ निवड बुद्धिबळ स्पर्धा आज सुरू झाल्या. सनदी लेखापाल सतीश डकरे व अग्रमानांकित बुद्धिबळपटू श्रीराज भोसले यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर, धीरज वैद्य, प्रीतम घोडके, उत्कर्ष लोमटे, आरती मोदी व महेश व्यापारी उपस्थित होते.

या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 73 बुद्धिबळपटू नी या स्पर्धेत भाग घेतला आहे...यापैकी 40 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.आज झालेल्या चौथ्या फेरीनंतर, द्वितीय मानांकित आदित्य सावळकर, चौथा मानांकित प्रणव पाटील, पाचवी मानांकित दिव्या पाटील व सहावा मानांकित  सोहम  खासबारदार हे चौघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.

अग्रमानांकित श्रीराज भोसले तृतीय मानांकित रवींद्र निकम, ऋषिकेश कबनूरकर,  दिशा पाटील,  शंतनू पाटील, धनंजय इनामदार, अभय भोसले, शौर्य बगडिया, तृप्ती प्रभू शर्वरी कबनूरकर, संस्कृती सुतार,ी वेदांत बांगड, विवान सोनी, आरव पाटील, सर्वेश पोद्दार व अरिन कुलकर्णी हे सोळाजण तीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.रियार्थ पोद्दार,मुकुंल गोयंका, नारायण पाटील, व्यंकटेश खाडे पाटील,अरिना मोदी व अर्णव पाटील,  हे सहाजण अडीच गुणासह संयुक्तपणेे तृतीय स्थानावर आहेत.

Comments