दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य

 मंगळवार, २५ जुलै २०२३







. अधिक श्रावण शुक्ल सप्तमी. वर्षा ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे"  


चंद्र नक्षत्र - चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या/तुळ. 


मेष:- सकाळच्या सत्रात प्रवासातून  लाभ होतील. प्रेमात यश लाभेल. खुशखबर मिळेल. नोकरीत मात्र कामाचा ताण वाढेल.

 

वृषभ:- वक्तृत्वातून लाभ होतील. लेखकांना यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.

 

मिथुन:- बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. मौल्यवान खरेदी होईल. 


कर्क:- चातुर्याने प्रसंग हाताळले जातील. कलाकारांना उत्तम यश मिळेल. छोटे प्रवास घडतील.

 

सिंह:- तुमच्याच राशीत बुध आणि शुक्र असून चंद्राशी शुभ योग करत आहेत. अत्यंत आनंदी दिवस आहे. मौज कराल. 

  

कन्या:- आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल. छंद जोपासाल. प्रवासात काळजी घ्या.

 

तुळ:-  अत्यंत अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. कला, क्रीडा प्रांतात कौतुक होईल.

 

वृश्चिक:- नोकरीतून नवीन ओळखी होतील. महिला सहकारी मदत करतील. मात्र कामाचा ताण वाढेल. 


धनु:- उत्तराध अनुकूल आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन खरेदी होईल.

 

मकर:- नोकरीत सुखद अनुभव येईल. व्यवसायात वाढ होईल. पत्नीशी मतभेद होऊ शकतात.   

 

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. पत्नीकडून लाभ होतील. विवाह इच्छुकांना खूषखबर मिळेल. प्रवासात काळजी घ्या.

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. संथपणे दिवस व्यतीत होईल. आर्थिक लाभ होतील. राजकारणात कटू अनुभव येईल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments