"दोस्ताना" संगीतमय मैफिल : पूर्णा इव्हेंट्स चा सलग तिसऱ्या वर्षीचा बहारदार नजराणा
कोल्हापूर, ४ सिटी विशेष
दरवर्षी आपल्या एक वेगळ्या शैलीत कलानगरीतील रसिकांसाठी खास संगीतमय मैफील घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध असलेले मंगल नियोगी यांच्या पूर्णा इव्हेंट्स यांनी यावर्षी मैत्रीचा धागा पकडून "दोस्ताना" या सुंदर थीम वर एक संगीतमय मैफिल केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केली होती. त्याला कोल्हापूरच्या दर्दी रसिकांनी चांगलीच दाद दिली.
आशा भोसले, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या हिंदी गीतांचा नजराणा चेन्नई, मुंबई व कोल्हापुरातील दिग्गज गायकांनी सादर केला. या मैफलीत देशातील, महाराष्ट्रातील व कोल्हापुरातील गायकांनी गीते सादर केली.
ही संगीतमय मैफिल जे. एस. शेखर दिग्गज गायकांनी गायलेल्या गाण्यांना (चेन्नई), क्रितिका श्रीनिवासन , रणजित बुगाले (कोल्हापूर), अर्चना निकम ,शर्वरी जाधव यांनी आपल्या सुरांनी ही मैफिल चांगलीच सजवली. महेंद्र कुलकर्णी यांचे सुरेख निवेदन कार्यक्रमला एक वेगळीच उंची मिळाली.
मंगल नियोगी यांनी त्यांच्या पूर्णा इव्हेंट्स या संस्थेद्वारें स्थानिक कलाकारांसोबत इतर राज्यातील कलाकारांची योग्य रित्या सांगड घालून लोकल ते ग्लोबल कलाकारांचे व्यासपीठ च निर्माण केले आहे.
पूर्ण इव्हेंटचा हा तिसरा कार्यक्रम कोल्हापुरात झाला आणि असेच नवीन दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी या संस्थेमार्फत होतील आणि लोकल ते ग्लोबल असे लोक कलाकारांचे कलाकारांचे एक व्यासपीठ च ही संस्था होईल असा आशावाद इ सिटी न्यूजशी बोलताना मंगला नियोगी यांनी सांगितले. इ सिटी न्यूज हे ह्या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.


.jpg)
Comments
Post a Comment