दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य

 बुधवार, २३ ऑगस्ट २०२३





. श्रावण शुक्ल सप्तमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


"आज सकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे"


चंद्र नक्षत्र - स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ.


मेष:- पती/पत्नीशी मतभेद संभवतात. किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात. कर्मचार्यांशी जुळवून घ्या. 

     

वृषभ:- व्यवसायात वाढ होईल. मात्र अधिक मेहनत करावी लागेल. संध्याकाळ आनंदाची.

 

मिथुन:- योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या. अन्यथा अडचणीत वाढ होईल. तब्येत सांभाळा.   


कर्क:- माता आणि भार्या यांच्यात समझोता करावा लागेल. घरात शांतता पाळावी लागेल.   

 

सिंह:- व्यवसाय वृद्धी होईल. नवीन आव्हाने मिळतील. त्यातून यशस्वी वाटचाल कराल.

  

कन्या:- कुटुंबास वेळ द्यावा लागेल. छोटी सहल घडेल. शब्दास मान मिळेल.

 

तुळ:- आत्मविश्वास वाढेल. घरात काही मोठे बदल कराल. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील.

 

वृश्चिक:-  नवीन मार्ग सापडेल. प्रगतीचा वेग वाढेल. मात्र संयम ठेवावा लागेल. आप्त भेटतील.


धनु:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. मात्र भागीदारी व्यवसायात वाद संभवतात.

 

मकर:-  नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सहकार्य मिळण्यास अडथळे येतील. वादाचे प्रसंग टाळा.  

 

कुंभ:-  बौद्धिक क्षेत्रात पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल. व्यवसायात अति धाडस नको. लेखन करताना काळजी घ्या.   

 

मीन:- दीर्घकालीन फायद्याचे नियोजन होईल. मात्र संयम बाळगावा लागेल. आरोग्यकडे दुर्लक्ष नको.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments