आप ने जाहीर केले नवीन अध्यक्ष
जिल्हाध्यक्षपदी अरुण गळतगे, शहराध्यक्षपदी उत्तम पाटील यांची वर्णी
उच्चशिक्षित तरुण नेतृत्वाला आप ने दिली संधी
कोल्हापूर ३ सिटी न्यूज नेटवर्क
आम आदमी पार्टीने राज्यभर संघटन विस्ताराचे काम सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष (कोल्हापूर महानगरपालिका) पदांच्या निवडी सह-प्रभारी गोपाल इटालिया व प्रदेश संघटनमंत्री संदीप देसाई यांनी जाहीर केल्या.
जिल्हाध्यक्षपदी चिखली, ता. कागल येथील अरुण गळतगे यांची निवड करण्यात आली. गळतगे उच्चशिक्षित असून सहकारी संस्था, रिटेल मार्टच्या माध्यमातून समाजातील अनेकांच्या आर्थिक सबलीकरणाचे काम ते गेले अनेक वर्षे करत आहेत.
कोल्हापूर शहराध्यक्षपदी उत्तम पाटील यांची वर्णी लागली. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी पक्षात सक्रियपणे कार्यरत राहत पक्षाचा विद्यार्थी प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी, जिल्हा युवाध्यक्ष या पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. संघटन, कल्पक आंदोलने, पाठपुरावा आणि कामातील सातत्य पाहून पक्षाने त्यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे प्रदेश संघटनमंत्री संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.

Comments
Post a Comment