दैनिक राशिभविष्य
सोमवार, २५ सप्टेंबर २०२३.
भाद्रपद शुक्ल एकादशी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - उत्तराषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
"आज क्षय दिवस" *परिवर्तीनी(स्मार्त) एकादशी*
मेष:- मोठे यश देणारा दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. शासकीय नियम मात्र कटाक्षाने पाळा.
वृषभ:- जेष्ठ व्यक्ती आणि राजकीय क्षेत्र यातून लाभ होतील. प्रवास घडतील. खर्च वाढतील.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. मोठे धाडस नको. मात्र काही चांगल्या घटना घडतील.
कर्क:- महिलांना चांगला दिवस आहे. अनुकूल घटना घडतील. बौद्धिक चमक दाखवाल.
सिंह:- आज मेहनत घेतल्यास अधिक चांगली कामे होतील. अंदाज अचूक ठरतील.
कन्या:- नियोजित कामात बदल घडेन. फार अपेक्षा ठेवू नका. संयम बाळगणे आवश्यक आहे.
तुळ:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. सावकाश निर्णय घ्या. मोठी गुंतवणूक टाळा. योग्य सल्ला घ्या.
धनु:- अनुकूल गुरू तुम्हाला सौख्य प्रदान करेन. मात्र खर्चात देखील वाढ संभवते. विवाह इच्छुकांना खुशखबर मिळेल.
मकर:- आत्मविश्वास वाढेल. जेष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.
कुंभ:- प्रतिकूल दिवस आहे. खर्च वाढतील. अनुकूल रवी प्रतिष्ठा सांभालेल.
मीन:- उत्तम दिवस आहे. प्रगतीचा कालावधी आहे. मार्ग सापडेल. आयुष्याची दिशा निश्चित होईल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, कान -नाक- डोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेaश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment