दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

शनिवार, १४ ऑक्टोबर २०२३. 







भाद्रपद अमावस्या. वर्षा ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज वर्ज्य दिवस आहे" *सर्वपित्री दर्श अमावस्या* *आज कांकणाकृती सुर्यग्रहण आहे मात्र ते भारतातून दिसणार नाही. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि कॅनडा येथून ग्रहण दिसेल.*   


नक्षत्र: हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी- कन्या. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) रोग स्थानात चंद्र बुध युती आहे. आरोग्याची काळजी घ्या. सूर्य उपासना करा. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक नियोजन करताना काळजी घ्या. मोठे करार आज नकोत. संततीची काळजी वाटेल. 

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) पशूं पासून काळजी घ्या. गृहकलह टाळा. वाहनापासून त्रास संभवतो.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईक भेटतील. चुकीची औषध योजना होऊ शकते.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) सत्य बाजू असूनही आरोप होऊ शकतात. गैरसमज टाळा. डोळ्यांची काळजी घ्या.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल.  प्रतिष्ठा वाढेल. छोटे प्रवास घडतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल कालावधी नाही. खर्चात वाढ होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकुल कालावधी आहे. व्यवसायात वाढ होईल. कष्टाचे चीज होईल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामाचा ताण वाढेल. नोकरीत त्रास जाणवेल. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरातील जेष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. प्रवासात त्रास. खर्चात वाढ होईल. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) प्रतिकूल दिवस आहे. अष्टमी स्थानी चंद्र, रवी आणि बुध आहेत. चुकीचे निर्णय होऊ शकतात. काळजी घ्या.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) जुने शत्रू डोके वर काढतील. विनाकारण वाद संभवतात. कनिष्ठ व्यक्तीकडून धोका होऊ शकतो.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


 ७ ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर नेपच्यून आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि तुमचे ध्येय अत्यंत उच्च असतात. परंपरागत प्रथांबद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा अनुभव घेतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून व्यवहारात त्याचा उपयोग होतो. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला हौस असते. तुम्हाला क्रीडा, प्रवास, संगीत याची आवड असून तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असते. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात आणि दुरदेशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही सर्वसाधारण किंवा तुमच्यापेक्षा कमी प्रतीच्या माणसांमध्ये मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला आवडते. तुम्हाला स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण जाणीव आहे. तुम्ही संशयी असून प्रत्येक गोष्टीची खात्री झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. हातातील कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही पूर्व नियोजन करतात. तुमच्यामध्ये दुरदर्शीपणा आणि व्यापारी वृत्ती असते. मनाने तुम्ही मोकळे असून तुमच्या कृतीमध्ये मुक्तपणा आहे मात्र तुमचे मन कायम अस्वस्थ असते.


व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, हिरवा, निळा, पिवळा.


शुभ रत्न:- पाचू, मोती, पुष्कराज, लसण्या.


(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments