सौ. शिलादेवी डी. शिंदे हायस्कूल ने संपूर्ण तपोवन परिसर केला स्वच्छ
कोल्हापूर दि.1 सिटी न्यूज नेटवर्क
तपोवन ज्या तपोभूमीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पदस्पर्श लाभले आणि ती तपोभूमी पुनीत झाली होती..अशा तपोभूमीत असणाऱ्या विद्यापीठ सोसायटीच्या सौ. शीला देवी डी. शिंदे सरकार हायस्कूल च्या सर्वच विद्यार्थी शिक्षिक कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून एक आदर्श निर्माण केला...
या शाळेतील सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक शिक्षिका आणि कर्मचाऱ्यांनी
म.गांधी जयंतीच्या निमित्ताने या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मिनी पद्माकर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित श्रमदानातून स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबवविले..
संपूर्ण शालेय परिसर आणि तपोवन परिसरही स्वच्छ करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. पद्मिनी कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग पाटील या शिक्षकांनी सामुदायिकरीत्या पंचप्राण ही प्रतिज्ञा घेतली...
" वीर गाथा*" स्वातंत्र्य काळातील धगधगते
विचार सांगणारे लेखन वर्गातील अनेक फलकांवर लिहण्यात आले. सामूहिक रित्या त्याचे वाचनही विद्यार्थ्यांनी केले.
शिक्षक नंदकिशोर संकपाळ यांनी स्वातंत्र्य संग्रामातील सहभागी वीर पुरुषांची महती सांगणारी "प्रश्नमंजूषा "ही स्पर्धा घेतली...
म. गांधी यांच्या जन्मापासून ते अखेरच्या काळातील सर्वच प्रसंग घटनांचा आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यात आला.. त्यावरील कथाकथन स्पर्धाही घेण्यात आल्या.. ईयत्ता 5 वी ते 8 वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.. सौ पद्मिनी कापसे यांनी *"वैष्णव जनतो तेणें कहीये आणि रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम "*
ही महात्मा गांधीजी यांची आवडती भजने विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतली .. आजचा *स्वच्छता ही सेवा* हा कार्यक्रम यशस्वी संपन्न करण्यासाठी बाबासो कदम सौ.रेश्मा मोहिते सौ.श्रीबाला पाटील नंदकिशोर संकपाळ या व सर्वच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.



Comments
Post a Comment