दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

बुधवार, १८ ऑक्टोबर २०२३. 






अश्विन शुक्ल चतुर्थी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज दुपारी १.०० पर्यंत चांगला  दिवस आहे" *विनायकी चतुर्थी* 


नक्षत्र - अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस नाही. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको. अति धाडस अंगाशी येतील.  

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) पत्नी खुश राहील. मात्र गृहकलह टाळा. वाहन दुरुस्ती करावी लागेल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अर्थीक बाबतीत उत्तम दिवस आहे. काळजी नसावी. नात्यात गैरसमज होऊ देऊ नका.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धन स्थानात शुक्र आहे. आर्थिक घडी बसेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घशाची काळजी घ्या. 

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मानसिक सुख लाभेल. मन प्रसन्न राहील. शेजाऱ्यांशी वाद नकोत.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक आवक वाढेल. मनासारखी कामे होतील. मात्र खर्च वाढतील.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. अनेक दिवस ज्याची वाट बघत होतात ती संधी चालून येईल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) कामाच्या ठिकाणी नवीन ओळखी होतील. ताण वाढेल. नवीन जबाबदाऱ्या येतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) फारशी अनुकूलता नाही. संयम ठेवा. प्रलोभने टाळा.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. मन आनंदी राहील. चांगली बातमी समजेल. आरोग्य सांभाळा.  


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगलेअनुभव येतील. भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. शुक्र आणि चांद्रयाचा केंद्र योग् आहे. प्रवास घडतील. मात्र खर्च वाढेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments