दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, १५ नोव्हेंबर २०२३





. कार्तिक शुक्ल द्वितीया. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज आनंदी दिवस आहे" *यम द्वितीया, भाऊबीज* 


नक्षत्र - जेष्ठ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चांगली कमाई होणार आहे. स्त्री धनात वाढ होईल. प्रवासात काळजी घ्या.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. व्यापारात मोठा फायदा होईल. आनंदी राहाल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभाचा दिवस आहे. वेळ दवडू नका. महत्वाची कामे पूर्ण करा. 


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) 

मौल्यवान खरेदी होईल. संतती कडून खुश खबर मिळेल. शिक्षणात उत्तम यश लाभेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) गृहकर्तव्य पार पडेल. आप्त भेटतील. नातेवाईक/ मित्र याना वेळ द्यावा लागेल. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) मन प्रसन्न राहील. मौजेवर खर्च कराल. भौतिक सुखे प्राप्त होतील. लेखनातून आनंद मिळेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चैनीवर खर्च कराल. बौद्धिक कामात यश मिळेल. नेतृत्व गुण दिसून येईल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत शुभ दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. कष्टाचे चीज होईल. संधीचा फायदा घ्या.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी जरा वेगळे अनुभव येतील. महिलांकडून लाभ होतील.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अतिशय उत्तम दिवस आहे. सर्वार्थाने सौख्य प्रदान करणारा कालावधी आहे. वाहन सुख लाभेल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्त्री धन वाढेल. अचानक भेटी मिळतील. कार्तिक अडचण दूर होईल. व्यवसायातून लाभ होतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) प्रेममय दिवस आहे. कधी तरी त्याग केला होता त्याचे शुभ फळ मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.


 १५ नोव्हेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


       तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला उच्च दर्जाची बुद्धिमत्ता लाभली आहे. उत्तम स्मरणशक्तीचा वरदान आहे. गूढ विद्या आवडतात मात्र काळ्या जादूकडे वळण्याची भीती असते. तो प्रांत टाळला पाहिजे. तुम्ही अत्युच्च सरकारी जागी काम करू शकतात. तुमचा स्वभाव बढाईखोर असतो. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात. तुम्ही विनाकारण काळजी करून मन अस्वस्थ करून घेतात. भाषणे तसेच लेखन यात यश मिळते. इतरांसाठी तुम्हाला त्याग करावा लागतो. शक्यतो दुसऱ्यांवर टीका करणे तुम्ही टाळावे.    


व्यवसाय:- सराफी व्यवसाय,संगीतकार, हॉटेल, केमिस्ट, सुगंधी द्रव्ये विक्री, इतिहास, खनिज द्रव्ये विक्री, रत्ने विक्री, तत्वज्ञान.


शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- निळा, गुलाबी. 


शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments