दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३. 






अश्विन कृष्ण दशमी/एकादशी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज भद्रा वर्ज्य दिवस आहे" *घबाड सकाळी ८.२४ पर्यंत* 


नक्षत्र - पूर्वा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) शत्रू पराभूत होतील. प्रशासकीय कामे मार्गी लागतील. कोर्ट कामात यश मिळेल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खनिज व्यापारात उत्तम लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. माते कडून लाभ होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) धाडसी निर्णय घ्याल. शेअर्स मधून लाभ होऊ शकतात. अचानक लाभाचे योग् आहेत.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) धनवृद्धी होईल. व्यापारात यश मिळेल. सिद्धी प्राप्त होतील. मन प्रसन्न राहील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवास घडतील. नवनवीन कल्पना राबवाल. राजकीय लेखक आणि पत्रकारांना यश मिळेल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. कठोर भूमिका घ्याल. येणी वसूल होतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आत्मविश्वासपूर्ण दिवस आहे. नवीन ऊर्जा मिळेल. कोर्ट कामात यश. शत्रू पराभूत होतील.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नाराज ग्रहांचा अनुभव येईल. तरीही काही सुखद अनुभव येतील. खर्च होतील मात्र कारण योग्य असेल.  


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दूर प्रदेशाशी संबंध येईल. आरोग्यात सुधारणा होईल. शासकीय मान सन्मान मिळतील. 

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अजूनही फारसी अनुकूलता नाही. मात्र राजकीय यश प्राप्त होईल. स्त्री धन वाढेल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कष्टाचे चीज करणारा दिवस आहे. दबदबा वाढेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक एखादी सुखद घटना घडेल. संपत्ती वाढेल मात्र धोपट मार्ग सोडू नका अन्यथा संकट ओढवेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments