दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

गुरूवार, २१ डिसेंम्बर २०२३. 







मार्गशीर्ष शुक्ल नवमी. हेमंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज उत्तम दिवस आहे"  


चंद्र नक्षत्र - रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन/मेष.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) ऋण फेडावे लागेल. संकटातून सुरक्षित बाहेर पडाल. भागीदारी व्यवसायात बेबनाव होऊ शकतो.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाचा ठसा उमटेल. दबदबा वाढेल. अडचणी दूर होतील. स्त्री धन वाढेल. मात्र भौतिक सुखासाठी खर्च कराल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीत मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठ खुश होतील. आरोग्यात सुधारणा होईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) तीर्थयात्रा घडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दीर्घकाळ टिकणार आनंद मिळेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. जपून वाटचाल करावी लागेल. व्यवसायात वाढ होईल.  

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) नात्यातून उत्तम सहकार्य मिळेल. काळजी दूर होईल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रगती साठी चांगले ग्रहमान आहे. कठोर बोलले जाईल. पत्नीशी मतभेद होऊ शकतात.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) पंचम स्थानी चंद्र आहे. अकल्पित धनलाभ होईल. ग्रंथ वाचन घडेल. गूढ उलगडतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) स्थावर संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. सौख्य लाभेल. शेतीतून उत्पन्न मिळेल.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अहंकार टाळल्यास उत्तम प्रगती होईल. सुखद घटना घडतील. मात्र नोकरी आणि घर यात ओढाताण संभवते.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अनुकूल बुध - शनी योग तुम्हाला यश देईन. प्रवासातून लाभ मिळतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उद्योगात वाढ होईल. भाग्योदय होईल. मेजवानी मिळेल. परदेश गमन घडेल.


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments