दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य

सोमवार, ११ डिसेंम्बर २०२३. 








कार्तिक कृष्ण त्रयोदशी/चतुर्दशी. शरद ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक. 


"आज क्षय तिथी" *शिवरात्री* श्री. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव, आळंदी. भद्रा सकाळी ७.११ ते संध्याकाळी ६.५३ 


मेष:- प्रतिकूल दिवस आहे. व्यवसायात अडचणी संभवतात. शत्रू त्रास जाणवेल. पत्नीशी मतभेद टाळा.

     

वृषभ:- संमिश्र दिवस आहे. खर्चात वाढ संभवते. आज मोठे निर्णय घेऊ नयेत.    

 

मिथुन:- आर्थिक प्रगती होईल. मात्र व्यवसायात काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.  


कर्क:- ओढाताण होऊ शकते. अचानक एखादे काम समोर येईल. शेअर्स मध्ये नुकसान.  

 

सिंह:- गृह कलह होऊ शकतो. मोठे व्यवहार करताना जपून करा. आर्थिक नियोजन करा. 

  

कन्या:- आर्थिक दृष्टया चांगला दिवस आहे. गरिबांचा कळवळा येईल. मदत कराल. पुण्य फळ प्राप्त होईल.   

 

तुळ:- क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. जवळची व्यक्ती अचानक शत्रू होऊ शकते. कौटुंबिक गैरसमज टाळा.

 

वृश्चिक:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. उत्साह वाढेल. काही सुखद क्षण अनुभवाल. गृहकलह टाळा.


धनु:- प्रतिकूल ग्रहमान आहे. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. आराम करणे हिताचे आहे.  

 

मकर:- अनुकूल दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. प्रशासकीय कामासाठी वेळ द्यावा लागेल.      

 

कुंभ:- स्व राशीतील शनीशी चंद्राचा केंद्र योग आहे. नोकरीत अडचणी निर्माण होऊ शकतात. पित्याची काळजी घ्या.

 

मीन:- शांततेने आणि संयमाने वागण्याचा कालावधी आहे. घाई गडबड नको. पाण्यापासून काळजी घ्या.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)


आज रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


       तुमच्यावर शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जन्मताच कलाकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही मित्र मंडळीत लोकप्रिय असतात. तुमची स्वतंत्रपणे काम करण्याची वृत्ती आहे. तुमच्यात संघटन क्षमता आहे. तुम्हाला परंपरा आणि सामाजिक बंधने आवडत नाहीत. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वभाव खर्चिक आहे. उच्च प्रतीचे दागिने, वाहने, सुगंधी द्रव्ये आणि सुंदर वस्तू यांसह तुम्हाला विलक्षण आकर्षण असते. स्वभाव पद्धतशीर आणि अभ्यासू आहे. तुम्ही उत्तम सल्लागार आहात. मित्रांना मदत करतात. डोके शांत ठेवून आणि अहंकार बाजूला ठेऊन काम केल्यास तुम्ही उत्तम प्रगती साधू शकतात.    


व्यवसाय:- सराफी व्यवसाय,संगीतकार, हॉटेल, केमिस्ट, सुगंधी द्रव्ये विक्री, इतिहास, खनिज द्रव्ये विक्री, रत्ने विक्री, तत्वज्ञान.


शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- निळा, गुलाबी. 


शुभ रत्न:- हिरा, पाचू, मोती.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments