डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेत दहा विदेशी खेळाडूच साडे सहाशे खेळाडू सहभाग उत्साही वातावरणात स्पर्धा प्रांरभ

 डेक्कन स्पोर्ट्स क्लब तर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेत दहा विदेशी खेळाडूच साडे सहाशे खेळाडू सहभाग उत्साही वातावरणात स्पर्धा प्रांरभ 




कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क 

आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या डेक्कन स्पोर्ट्स  क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेत दहा विदेशी खेळाडू - 190 पर प्रांतीय खेळाडू '

 सह साडे सहाशे खेळाडू सहभागी झाले आहेत .आज पहाटे या स्पर्धेतील पहिला टप्पा असलेल्या स्विमिंग स्पर्धेस  राजाराम तलावात उत्साही वातावरणात परंपरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आणि सहकार्याने या स्पर्धेचे उद्घाटन केले .त्यांच्याशी पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा समन्वय उदय पाटील आणि वैभव बेळगावकर यांनी केले

      या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना स्विमिंग -  १.९ किलोमीटर,  सायकलिंग - ९०  किलोमीटर आणि रनिंग - २१ किलोमीटर अंतर पार करावे लागते यामध्ये त्यांचा शारीरिक कस लागून  मानसिक आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून येतो . स्पर्धेमध्ये ट्रायथलॉन ही स्पर्धा तीन प्रकारांमध्ये होत आहे ज्यांना स्विमिंग येणार नाही त्यांना रनिंग आणि सायकलिंग या स्पर्धेत  सहभागी होण्याची संधी खेळाडूंना लाभली . ही स्पर्धा १८ ते ३०,३१ते ४०,४१ ते ५० व ५१ च्या पुढील सर्व अशा वयोगटात होणार आहेत सकाळी ६ वाजता बर्गमॅन डुएथलॉन ,६.१५ वाजता ऑलिंपिक डुएथलॉन,६.३० वाजता बर्गमॅन ११३ ची ट्रॉएथलॉन,६.४५ वाजता ऑलिंपिक ट्रॉएथलॉन  या वेळेत या विविध स्पर्धांना प्रांरभ झाला .

.या स्पर्धेच्या यशस्विते साठी डेक्कन चे  जयेश कदम,राजीव लिंग्रज,उदय पाटील,वैभव बेळगावकर, संजय चव्हाण,अमर धामणे,अभिषेक मोहिते,अतुल पोवार,डॉ. समीर नागटिळक,डॉ. संदीप पाटील,समीर चौगुले आदिसह सिद्धिविनायक हॉस्पिटलची वैद्यकीय टीम कार्यात होती स्पर्धेचे ठिकाणी चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती .स्पर्धेच्या मार्गावर शिवाजी विद्यापीठ - शाहू जकात नाका -  कागल ते निपाणी रोडवर विविध संस्था संघटनांनी वाद्य वाजवत  खेळण्याचे स्वागत केले .शहर तसेच महामार्ग पोलिसांचे या स्पर्धेच्या यशस्वी साठी मोठे योगदान लाभले .

Comments