दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

शनिवार, ९ डिसेंम्बर २०२३. 







कार्तिक कृष्ण द्वादशी. शरद ऋतू, दक्षिणायन. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज वृद्धी दिन आहे" *भागवत एकादशी*   


नक्षत्र: चित्रा/स्वाती. आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अत्यंत अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल. प्रवासातून नवीन ओळखी होतील. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचा दिवस आहे. मौल्यवान खरेदी होईल. महिलांकडून लाभ होतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) गुंतवणुकीतून लाभ मिळतील. विरोधातून देखील काहीतरी शिकायला मिळेल. कर्जे घेणे टाळा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वास्तू पुरुष प्रसन्न राहील. घरासाठी वेळ द्यावा लागेल. गृहिणींना वाव मिळेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम आर्थिक लाभ होतील. स्त्रियांना दागिना मिळेल. गुंतवणूक कामी येईल. संतती कडून लाभ होतील. 

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) धनप्राप्ती होईल. भौतिक सुखे मिळतील. पशु लाभ होतील. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) प्रणय रम्य दिवस आहे. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. मन आनंदी राहील. कनिष्ठ सहकारी मात्र नाराज होऊ शकतात.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. अनेक चांगल्या घटना घडतील. बौद्धिक क्षेत्र गाजवाल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. चातुर्याने निर्णय घ्याल. विरोधक चकित होतील. 

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतील. कौटुंबिक वाद विवाद असल्यास मिटतील. वाटचाल सुकर होईल.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लक्ष्मी प्रसन्न होईल. प्रगतीची घोडदौड चांगली होणार आहे. दीर्घ कालीन नफा होईल.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. स्त्री धन वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. प्रश्न सुटतील.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)


९ डिसेंम्बर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

     तुमच्यावर मंगळ ग्रहाचे आधिपत्य असल्याने तुम्ही कणखर, लढाऊ, परिस्थितीला यशस्वी तोंड देणारे, आक्रमक असे आहात. कोणताही पराभव तुमच्या जिव्हारी लागतो. एक वेळ तुम्ही मृत्यु पत्करतो म्हणाल पण पराभव पचवू शकणार नाही. तुम्ही शीघ्रकोपी असून धाडसी, पराक्रमी, क्रीडाप्रेमी आणि वादविवादात जिंकणारे आहात. तुमच्यात कधीकधी खोटा अभिमान आणि उद्धटपणा दिसून येतो. इतरांवर टीका करणे आणि विनाकारण वाद घालणे टाळले पाहिजे. तुमच्या लैंगिक भावना तीव्र असतात. आजारी लोकांना स्वतःच्या आंतरिक शक्ती ने बरी करण्याची ताकद तुमच्यात असते. तुम्ही ठाम विचारांचे असून प्राणी आणि मुले तुम्हाला प्रिय आहेत. मित्रांसाठी तुम्ही काहीही करू शकतात. तुम्ही विश्वासु असून कायदा पालन करणे तुम्हाला आवडते.


व्यवसाय:- वकील, धर्मगुरू, वक्ता, पुढारी, राजकीय नेता, उत्तम व्यवसायिक, केमिस्ट, धातू संबंधित, खाणी संबंधित यातून लाभ होतो.


आरोग्य:- उष्णतेचे विकार, मूत्राशय, मुळव्याध, पित्ताशय यापासून तरुणपणीच सावध राहिले पाहिजे.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ अंक:- 3, 6, 9.


शुभ रंग:- तांबडा.


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments