दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

सोमवार, १५ जानेवारी २०२४. 






पौष शुक्ल पंचमी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - शततारका/पूर्वा भद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ. 


"आज आनंदी दिवस" *मकर संक्रांती* 


मेष:- गूढ उकलतील. अनपेक्षित निर्णय घ्याल. अनुकूल चंद्र लाभ मिळवून देईन.  

     

वृषभ:- कामाच्या ठिकाणी उत्साहवर्धक वातावरण राहील. स्त्री धन वाढेल. जुनी येणी वसूल होतील.  

 

मिथुन:- दानधर्म करण्यास अनुकूल कालावधी आहे. शत्रू पराभूत होतील. कनिष्ठ वर्गाकडून सहकार्य मिळेल.  


कर्क:- प्रतिकूल दिवस आहे. आशादायक चित्र नाही. मात्र नोकरीत काही अनपेक्षित सुखद घटना घडतील.

 

सिंह:- सप्तमी स्थानी चंद्र आहे. धाडसी निर्णय घ्याल. प्रिय व्यक्तीसाठी वेळ द्यावा लागेल. प्रवास कार्यसाधक होतील.

  

कन्या:- अर्थलाभ होईल. काही महत्वाची निर्णय घ्यावे लागतील. दूरच्या नात्यातून लाभ होतील.   

 

तुळ:- प्रिय व्यक्तीची भेट होईल. उपयुक्त माहिती मिळेल. दूरदृष्टी दाखवाल. लेखनातून यश मिळेल.

 

वृश्चिक:- भूमिगत द्रव्यातून यश मिळेल. पर्यटन कराल. जमीन व्यवसायातून लाभ होतील.


धनु:- उत्तम दिवस आहे. संधीचे सोने कराल. सन्मान होतील. सरकारी कामे मार्गी लागतील.  

 

मकर:- राजकीय कामासाठी खर्च कराल. स्थावर संपत्तीचे प्रश्न सुटतील. प्रसिद्धीची हौस नको.       

 

कुंभ:- अस्वस्थता कमी होईल. आरोग्यात सुधारणा होईल. लखकाना यश लाभेल. 

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. खर्चात वाढ होऊ शकते.



(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments