ध्यानगुरु कुमार कृष्णमुर्तींचे कोल्हापुरात आगमन - शनिवारी करवीर नगर वाचन मंदिरात जाहीर व्याख्यानाचे आयोजन
ध्यानगुरु कुमार कृष्णमुर्तींचे कोल्हापुरात आगमन - शनिवारी करवीर नगर वाचन मंदिरात जाहीर व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
इनरलाईट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ध्यानगुरु कुमार कृष्णमुर्ती यांचे गुरुवारी (ता. १८) कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. उद्यापासून (गुरुवार) सोमवारपर्यंत (ता. २१) व्याख्यान, संवाद आदी कार्यक्रम होतील. श्री. कृष्णमुर्ती शहर आणि परिसरातील काही शैक्षणिक संस्थाना भेटी देतील. तिथे ते शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थीनींना ध्यानाबाबत मार्गदर्शन करतील. हे सर्व कार्यक्रम साधकांसाठी मोफत आहेत.
शनिवारी (ता. २०) करवीर नगर वाचन मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता ‘ध्यान साधनेची सोपी पद्धती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन’ यावर त्यांचे व्याख्यान होईल. इनर लाईट फाऊंडेशन आणि जायंटस् ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी यांच्यातर्फे हे व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यानाद्वारे ते साधकांच्या मनातील ध्यानाबद्दलच्या शंकांची उत्तरे देतील. त्यांचे शंकांनिरसन करतील. याबरोबर श्री. कृष्णमुर्तींच्या मुख्य शिष्या सौ. आनंदी रविनाथ या आयआयटी मुंबईमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ‘माईंड युवर डि.एन.ए.’ हे इंग्रजी पुस्तक त्यांनी तयार केले. सौ. आनंदी यासुद्धा ध्यानाबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देतील. साधकांशी संवाद साधतील.
इनर लाईट फाऊंडेशन मुंबई या नोंदणीकृत ट्रस्टची उभारणी श्री. कृष्णमूर्ती यांनी केली. ज्यातून ते ध्यान क्रियेचे महत्व सांगतात. श्री. कृष्णमुर्तींचे मूळ इंग्रजी पुस्तक ‘इनर लाईट कॉस्मिक मेडिटेशन’चा मराठी अनुवाद ‘ध्यान प्रकाश’ नावाने प्रसिद्ध झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीत ‘ध्यान प्रकाश’ या पुस्तकाचं खूप कौतुक केलं गेलं; कारण हे पुस्तक ध्यानाची एक पूर्ण मार्गदर्शिका आहे.शालेय मूल्य शिक्षण अंतर्गत शिक्षक आणि पालकांनीही या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोन्ही संयोजक संस्थांनी संयुक्त पणे केलेले आहे

Comments
Post a Comment