दैनिक राशिभविष्य
सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४.
मग शुक्ल तृतीया. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - पूर्वा भद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ/मीन.
"आज उत्तम दिवस आहे."
मेष:- सकाळची वेळ अनुकूल आहे. लवकर कामाला लागून महत्वाची कामे पूर्ण करा. संध्याकाळ खर्चात टाकणारी.
वृषभ:- उत्तम दिवस आहे. उदंड व्यावसायिक यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. परदेश गमन होईल.
मिथुन:- राजाधिकार मिळेल. वरिष्ठ खुश राहतील. प्रसिद्धी माध्यमातून चमक दाखवाल.
कर्क:- चंद्र शुक्राशी लाभ योग् करत आहे. प्रणयरम्य दिवस आहे. प्रिय व्यक्तीच्या सहवासात वेळ व्यतीत कराल. शत्रू पराभूत होतील. जलप्रवास घडेल.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. सकाळच्या सत्रात कामे पूर्ण करा. कनिष्ठ व्यक्तींशी सौहार्दाने वागा. आर्थिक बाजू बळकट होईल.
कन्या:- वाहन सुख लाभेल. शेअर्स मधून लाभ होतील. कार्यकुशलता वाढेल. अकल्पित धनलाभ होईल.
तुळ:- रसायने, खनिजे, औषधे यातील व्यावसायिकांना उत्तम दिवस आहे. संशोधनात प्रगती होईल. हरवलेली वस्तू सापडेल.
वृश्चिक:- धर्म कार्यात सहभी व्हा. काव्यात्मक घटना घडतील. शांतता लाभेल. महिलांना मौल्यवान भेटवस्तू मिळेल.
धनु:- अडलेली कामे पुढे सरकतील. कठोर बोलणे होईल. अन्न धान्य याची रेलचेल असेल. दागिने घडतील.
मकर:- आयुष्य सुंदर आहे, त्याचा उपभोग घ्या. चिंता दूर होतील. आयुष्याचा वेगळा अर्थ समजेल.
कुंभ:- उत्तम दिवस आहे. व्यय स्थानातील मंगळ, शुक्र खर्चात वाढ दर्शवतात. मात्र त्यांचा चंद्राशी शुभ योग आहे. नादुरुस्त वस्तू दुरुस्त करण्यास योग्य दिवस आहे.
मीन:- इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. वेळ न दवडता कामास लागा. धनप्राप्ती होईल. यश मिळेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment