दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

सोमवार, १९ फेब्रुवारी २०२४.







 माघ शुक्ल दशमी/एकादशी शिशिर. ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


चंद्र नक्षत्र - मृग/आर्द्रा.  आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.


"आज चांगला दिवस आहे." *छत्रपती शिवाजी महाराज जयंती* 


मेष:- आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. अनुकूल रवी, शनी स्वप्नपूर्ती करतील. व्यापारात यश.

     

वृषभ:- उत्तम दिवस आहे. उदंड व्यावसायिक यश मिळेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. सन्मान मिळतील.   

 

मिथुन:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. दीर्घकालीन लाभ होणाऱ्या घटना घडतील. जेष्ठांचे आशीर्वाद लाभतील. मन आनंदी राहील. 


कर्क:- संमिश्र दिवस आहे. अनुकूल चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे. मित्र मंडळींची भेट होईल. तुमच्यापासून इतरांना लाभ होईल.

 

सिंह:-  निकोप स्पर्धेचा अनुभव येईल. भयाचे सावट दूर होईल. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. शत्रू माघार घेतील.

  

कन्या:-नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अधिकारात वाढ होईल. भागीदारी व्यवसायात उत्तम यश लाभेल.  

 

तुळ:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्तीकडून प्रतिसाद मिळेल. आज केलेली उपासना लवकर फळाला येईल. सिद्धी प्राप्त होतील.   

 

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कारखान्यात नवीन बदल कराल. उत्साही वाटेल. कार्यक्षमता वाढेल.


धनु:- तुमचा दबदबा वाढवणारा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. वादविवाद मिटतील. हातून मोठे काम घडेल.  

 

मकर:- कर्तृत्व गाजवण्याचा दिवस आहे. मौजमस्ती कराल. जीवनाचा आनंद घ्याल. शंका दूर होतील.  

 

कुंभ:- स्व राशीतील रवी, शनी आणि त्यांचा चंद्राशी लाभ योग उत्तम कार्यपूर्ती करणारा आहे. महत्वाचे निर्णय आज जरूर घ्या. योग्य मार्गदर्शन मिळेल.

 

मीन:- संमिश्र दिवस आहे. आरोग्याचे प्रश्न सुटतील. योग्य औषध योजना होईल. मातृभूमीची सेवा कराल. एखादी पदवी प्राप्त होईल.   


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments