दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

रविवार, ४ फेब्रुवारी २०२४







. पौष कृष्ण नवमी. हेमंत ऋतू. शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे" *घबाड संध्याकाळी ५.५० नन्तर*


चंद्रनक्षत्र - विशाखा/अनुराधा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. 


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यवसायात वाढ होईल. नोकरीत अधिक काम करते लागेल मात्र त्याचा लाभ मिळेल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) जोडीदारासोबत सहलीचा बेत आखाल. मन आनंदी राहील. कामाचा ताण असला तरी त्याकडे आज दुर्लक्ष कराल.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. मात्र आळस झटकून कामाला लागावे लागेल. आध्यत्मिक लाभ होतील.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अकल्पित लाभ होतील. उत्साही वाटेल. व्यावसायिक यश मिळेल. वाद मिटतील.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) छोटी सहल घडेल. काव्य, शास्त्र यात रममाण व्हल. चातुर्य दाखवाल. जोडीदाराशी वाद टाळा.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) छंद जोपासले जातील. भ्रमंती घडेल. नवनवीन कल्पना राबवाल. प्रयोगशील व्हाल.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सांपत्तिक स्थिती मजबूत होईल. इच्छापूर्ती होईल. मात्र मंडळी भेटतील. आनंदी राहाल.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. बुधाशी लाभ योग्य करत आहे. तुमचे वक्तृत्व सर्वांना आवडेल. बौद्धिक लेखन कराल. 

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. विनाकारण खर्च होईल. व्यवसायात जोरदार खरेदी - विक्री होईल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) उत्तम दिवस आहे. नवनवीन मित्र जोडले जातील. वस्त्र लाभ होईल. खरेदीचे योग आहेत.

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कामाचा ताण वाढेल. प्रकल्प पूर्ण होतील. अचानक एखादे अप्रिय काम सामोरे येऊ शकते. 

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. भाग्यातील चंद्र आणि लाभातील बुध इच्छा पूर्ण करतील. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments